Home विदर्भ अँड प्रदीप क्षीरसागर पाटील यांना यंदाचा छत्रपती संभाजी महाराज समाज गौरव पुरस्कार...

अँड प्रदीप क्षीरसागर पाटील यांना यंदाचा छत्रपती संभाजी महाराज समाज गौरव पुरस्कार २०२२ जाहिर

91

 

अँड प्रदीप शांताराम क्षीरसागर पाटील यांना मराठा पाटील युवक समिती बुलडाणा जिल्हा यांच्या वतीने “छत्रपती संभाजी महाराज समाज गौरव पुरस्कार – २०२२” घोषित झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा हा धावता आढावा…..

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात निमखेड हे अँड प्रदीप क्षीरसागर यांचे मूळ गाव. सध्या उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे २००५ पासून वकील म्हणून कार्यरत आहेत. आज पर्यन्त उच्च न्यायालयात 1800 प्रकरण दाखल करून अनेकांना न्याय मिळवून दिला.

महत्त्वाचे खटले निकाली

जिगाव प्रकल्पात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहणा विरुद्ध पीड़ित शेतकऱ्यांच्या वतीने बाजू मांडून बेकायदेशीर अधिग्रहण उच्च न्यायालयात रद्द केले , त्यात दादुलगाव, पिम्पळगाव काळे, हिंगणा बाळापुर , नीमगांव पळशी ,वड़ोदा पानाचे येथील शेतकऱ्यांच्या ४०० एकर जमिनींचे अधिग्रहण रद्द केले. तसेच भंडारा जिल्ह्यातील गोसे खुर्द प्रकरणात २०५ शेतकऱ्यांच्या ५१० एकर जमिनींचे अधिग्रहण उच्च न्यायालयात रद्द केले. समृद्धि महामार्गात तालुका हिंगणा जिल्हा नागपुर येथील आठ गावातील शेतकऱ्यांच्या वतीने याचिका दाखल करित शेतकऱ्यांना मिळणारा अडीच पट मोबदला पाचपट केला त्यात शेतकऱ्यांचा करोड़ो रूपये फायदा झाला. कृषि विभागाअंतर्गत शेतकऱ्यांना सुमारे ३०० कोटी रूपयाचे अनुदान विविध शेती विषयक अवजारे , ट्रैक्टर , इत्यादि करिता दिले जात होते ,परंतु VAIDC मार्फ़त निकृष्ट अवजारे पुरविली जात त्या विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका शेतकऱ्यांच्या वतीने दाखल करून शासनास आता सबसिडी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून त्यास खुल्या बाजारातून अवजारे व अनुदानावर मिळणाऱ्या वस्तु घेता येतील या बाबत धोरण ठरवणारा शासन निर्णय काढावा लागला.
जळगाव जामोद तालुक्यात नोंदणी झालेल्या शेकडो शेतकऱ्यांच्या तूर खरेदी बंद केली असता त्या प्रकरणात जनहित याचिका दाखल करित तुर खरेदी चा प्रश्न मार्गी लावला.
विदर्भातील आठ जिल्ह्यातील अडीच हजार कर्मच्याऱ्या च्या याचिका दाखल करून त्यांना जूनी पेंशन योजना लागू केली
मलकापुर येथील वीर जगदेवराव सुतगिरणीच्या कामगारांना 36 लाख थकित पगार मिळवून दिला . मोहगाव जिल्हा नागपुर येथील शेतकऱ्यांच्या १९९६ साली जमीनी ताब्यात घेऊन २०१५ मधे मोबदला दिल्याच्या प्रकरणात १५ वर्ष जमीनी मोबदल्या विना वापरल्या म्हणून साढेचार कोटी भुभाड़े आणि ६ कोटी वाढ़ीव मोबदला मिळवून दिला, आदिवासी व नक्षल भागातील ३००० शिक्षकांच्या याचिका दाखल करून एकस्तर वेतनश्रेणी कायम ठेवण्या बाबत आदेश करून वसूली स्तगीत केली अशा अनेक याचिका दाखल करून पीड़ितांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले

सेवा कार्यात हातभार

वकिली व्यवसाय करत असतानाच अँड प्रदीप क्षीरसागर पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. जे लोक सेवाभावी कार्य करत असतात त्याना शक्य ती मदत करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यातील काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतल्या तर
शिवराय मंगल कार्यालय मलकापूर करीता १ लक्ष ५० हजार रुपये देणगी, शेगाव पाटिल समाज मंगल कार्यालय करिता ५१ हजार रुपये, जिजाऊ सृष्टि सिंदखेड़ करिता १ लक्ष रुपये देणगी त्यानी दिली असून विविध सेवा प्रकल्प व संस्था यांना ते मदत करत असतात. युवकाना त्यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन नेहमी लाभत असते . त्यांनी परिश्रम पूर्वक नावलौकिक मिळविला आणि ते समाजाचे भूषण ठरले आहे ,त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मराठा पाटिल युवक समिती बुलडाणा जिल्हा यांच्या वतीने यावर्षीचा छत्रपती संभाजी महाराज समाज गौरव पुरस्कार दिला जात आहे त्या निमित्ताने अँड प्रदीप क्षीरसागर पाटील यांचे हार्दिक अभिनंदन !