Home Breaking News वर्षे उलटूनही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम प्रलंबितच; गोपाल तायडे यांची मुख्याधिकारी...

वर्षे उलटूनही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम प्रलंबितच; गोपाल तायडे यांची मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा !

89

शेगाव : शहरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक सौंदर्यीकरन 1993 पासून करण्यात आले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी 28 जुलै 2021 रोजी आमरण उपोषना चे आंदोलन पुकारून उपोषन सुरु केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी न.प. प्रशासनाला जाग येऊन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक सौंदर्यीकरनाला 30 जुलै रोजी प्रशसकीय मान्यतेचे आश्वासन पत्र घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. गोपाल तायडे यांच्या पाठपुराव्याला मिळालेले यश तसेच स्मारक सौंदर्यीकरनाचा मार्ग मोकळा झल्याने मातंग समाजा मध्ये मोठया प्रमाणात जल्लोष ही करण्यात आला परंतु वर्ष उलटून गेले नंतर ही अजून पर्यंत स्मारकाचे कामाला सुरवात झाल्या नसल्याने स्वाभिमानी शहार अध्यक्ष गोपाल तायडे यांनी शेगाव नगर परिषद येथे नव्याने रजू झालेल्या मुख्य अधिकारी काटकर यांचा सत्कार घेऊन स्मारक सौंदर्यीकरण बद्दलची माहिती सांगून स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु करावे तसेच म्हाडा कॉलनीतील चेंबर आउटलेट मध्ये जोळून चेंबर प्रश्न कायमचा मार्गी लावा.त्याच बरोबर शहरातील पाणी पुरवठा पुर्वरित करून वेळ वाढविण्यात यावा करिता त्यांची भेट घेऊन हे सर्व प्रश्न त्वरित मार्गी लावावेत करिता सविस्तर चर्चा केली.