नागपूर : कोरोनाच्या लाटेत अनेकांना आपल्या नोकऱ्या पासून हात धुवावा लागला. त्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मात्र आता ची लाट आटोक्यात आल्यानंतर नव्याने उद्योग क्षेत्रात स्टार्टअप ला सुरुवात झाली असून नोकर भरतीच्या जागा सुद्धा निघत आहेत विविध कंपन्या नोकर भरती करणार आहेत .
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतात लवकरच मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये नोकऱ्यांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात जवळपास 1.80 ते 2 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहेत. अमेक्स, बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन स्टॅनले यासारख्या विविध कंपन्यांनी भारतात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
विविध मल्टिनॅशनल कंपनी आपल्या उद्योगाचे जाळे वेगाने वाढविण्यास सुरुवात केली आहे शहरातील देशातील मोठ्या या कंपन्यांची नोकर भरती लवकरच सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
2023 च्या अखेरीस चेन्नई, वडोदरा आणि पुणे या तीन जागतिक केंद्रांवर देशातील 5,000 पेक्षा जास्त लोकांना नोकरीवर घेण्याची योजना कंपन्या आखत आहेत. Deutsche India या कंपनीने या वर्षी 3,000 लोकांना कामावर ठेवण्याची योजना आखली आहे.
एसबीआय मध्ये बंपर भरती
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर, सपोर्ट ऑफिसर या पदांच्या एकूण 641 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
पदाचे नाव : चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर, सपोर्ट ऑफिसर (SBI Bharti 2022)
पद संख्या : 641 जागा
पद संख्या : 641 जागा
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत : 7 जून 2022
अधिकृत वेबसाईट : sbi.co.in
असा करा अर्ज :
● https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर ऑनलाईन अर्ज करा.
दहावी उत्तीर्णांसाठी मंत्रालय आणि सरकारी विभागात भरती!
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक पदांच्या एकूण 253 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पदाचे नाव : उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक
▪️ उच्च श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्ग : 30
▪️ उच्च श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्ग : 32
▪️ लघुटंकलेखक(इंग्रजी), गट क संवर्ग : 39
▪️ लघुटंकलेखक(मराठी), गट क संवर्ग : 52
▪️ निम्न श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्ग : 55
▪️ निम्न श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्ग : 45
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण + लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट + टायपिंग गती 30 ते 40 शब्द प्रति मिनिट.
अर्ज करण्याची मुदत : 12 मे 2022
अधिकृत वेबसाईट पाहा : mpsc.gov.in
वीज, रेल्वे विभागात भरतीची प्रक्रिया सुरू
यासह केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागात सुद्धा नोकरभरतीची प्रक्रिया सुरू असून जून व मे महिन्यामध्ये ही भरती केली जाणार आहे तरी दहावी बारावी व तत्सम पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या संबंधित विभागाच्या वेबसाईटवर जाऊन यासंबंधी माहिती प्राप्त करून घ्यायची आहे