Home नागपूर भास्कर लोंढे यांना दुसऱ्यांदा ‘चौथास्तंभ’ राज्य पत्रकारिता पुरस्कार’

भास्कर लोंढे यांना दुसऱ्यांदा ‘चौथास्तंभ’ राज्य पत्रकारिता पुरस्कार’

79

नागपूर :दैनिक लोकशाही वार्ताचे संपादक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भास्कर लोंढे यांना अप्रतिम चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार-२०२२ जाहीर झाला आहे.
यापुर्वी २०१९ या वर्षीसुद्धा निर्मिती, व्यवस्थापन व संपादन गटातून त्यांना अप्रतिम चौथास्तंभ विशेष राज्य पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाला होता.
२०२०- २०२१ या दोन वर्षांमध्ये संबंधित पत्रकाराने केलेले विशेष वृत्तांकन, विश्लेषण व पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष लावण्यात आले होते. त्यानुसार राजकारण ते पर्यावरण वृत्त गटातून पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत, अशी माहिती अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल फळे, संचालिका सौ.प्रीतम फळे, निमंत्रक सर्वश्री राहुल शिंगवी, रणजीत कक्कड, मानस ठाकूर, जगदीश माने, निशांत फळे यांनी औरंगाबाद येथे दिली आहे.
या निकषानुसार राजकीय वृत्त गटातून
भास्कर लोंढे यांना हा राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी लिहिलेल्या महाविकास आघाडी मंत्र्याच्या गैरकारभारावरील लिहिलेल्या वृत्तलेखमालेच्या आधारावर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबई येथे लवकरच होणाऱ्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

भास्कर लोंढे हे ३७ वर्षांपासून पत्रकारिता, जनसंपर्क , कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून ‘जनसंवाद विद्या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. लोंढे यांनी पत्रकारितेची सुरुवात वर्धा जिल्ह्यातून एक ग्रामीण वार्ताहर म्हणून केली. दैनिक नागपूर पत्रिका, लोकसत्ता, सामना, जनवाद, व देशोन्नती इत्यादी वर्तमानपत्रात वार्ताहर, जिल्हा प्रतिनिधी, उपसंपादक, वरिष्ठ वार्ताहर, ग्रामीण विभाग प्रमुख, सहाय्यक संपादक इत्यादी पदे त्यांनी भूषविली आहेत. यासोबतच जनसंपर्क व माध्यमे सल्लागार म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. तर कार्पोरेट क्षेत्रात लॉयड स्टील आणि उत्तम गल्वा स्टील या कंपन्यांमध्ये प्रेसिडेंट कार्पोरेट अफेअर्स पदावर कार्य केले आहे.