बेलगाव मध्ये डिजेचा आवाज कमी करण्यावरुन वाद
बेळगाव :- मेहकर तालुक्यातील बेलगाव ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलिस स्टेशन ठाण्यांतर्गत येत असलेल्या बेलगाव येथे २०/ हे रोजी रात्री घरासमोर लावलेल्या डिजेचा आवाज कमी करण्यावरुन झालेल्या वादात ८ जणांनी एकास मारहाण करुन गंभीर जखमी केले व ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेलगाव येथील श्रीराम मणीराम चव्हाण यांच्या मुलांचे लग्न २२ हे रोजी होते २० हे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास यांच्या घरासमोरील सुरेश मखराम राठोड यांच्या दारात मोठ्या आवाजात डिजे लावला होता चव्हाण यांनी आवाज कमी करण्याबाबत त्यांनां विनंती करत आमच्या घरी लग्न आहे पाहुणे आले आहेत आवाजाचा खुप त्रास होतोय असे सांगितले त्यावर आरोपी सुरेश राठोड.अनिल राठोड. दर्शन चव्हाण.कैलास राठोड.करण राठोड.केवल राठोड.मोहन राठोड.विनोद राठोड.यांनी लाठ्या काठ्या घेऊन चव्हाण यांच्या शी भांडण सुरू केले ज्यात श्रीराम चव्हाण.हे जखमी झाले भांडण सोडण्यास गेलेल्या श्रीराम चव्हाण यांच्या आईलाही एका आरोपींने मारहाण केली त्यात जखमी झाल्या आहेत प्रकरणी डोणगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
