Home Breaking News •देह व्यवसाय प्रकरण • चिमूर पोलिसांच्या धडक कारवाई नंतर आरोपीची कारागृहात...

•देह व्यवसाय प्रकरण • चिमूर पोलिसांच्या धडक कारवाई नंतर आरोपीची कारागृहात रवानगी*

8

देह व्यवसाय प्रकरण

चिमूर पोलिसांच्या धडक कारवाई नंतर आरोपीची कारागृहात रवानगी

चंद्रपूर :- काही दिवसापूर्वी चिमूर येथील वनिता बार वर चिमूर पोलिसांनी धाड टाकून वनिता बार च्या मालकीन वनिता रंगारी हिला अटक झाली असून एका पीडित महिलेला मुक्त करून सुधार गृहात आसरा दिला आहे. परत आज वनिताचे पती नंदू मोहिनकर यांनी त्यांच्या घरात किरायाने असलेल्या एका महिलेचा घरात घुसून तिला अश्लील ,लज्जास्पद शिवीगाळ केली,तसेच तिला देह विक्रीच्या व्यवसायाला लावतो अशी धमकी दिली,तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला, या तक्रारीवरून चिमूर पोलीसनी नंदू मोहिनकर याला अटक केली असून त्याच्यावर एका महिलेचा छड केल्याचा गुन्हा नोंदविला असून कोर्टात हजर केले असता कोर्टाने कारागृहात रवानगी केली आहे ‌.

चिमूर शहरात नंदू मोहिनकर ,आणि त्याची पत्नी वनिता रंगारी यांची दादागिरी करत असल्याच्या अनेक तोंडी तक्रारी चिमूर पोलीस यांना प्राप्त झाल्या होत्या अखेर चिमूर पोलिस यांनी मोहिनकर याची दादागिरी वर लगाम लावले असल्याने चिमूर पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे…परिसरातील पीडित नागरिकांनी या झालेल्या कारवाही बद्दल अतिशय समाधानाची भावना व्यक्त केली आहे….