Home राजकारण बुलढाणा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी ‘नाना’ यांना द्या !

बुलढाणा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी ‘नाना’ यांना द्या !

77

 

निष्ठावान कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी

बुलडाणा – वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले तसेच अहोरात्र समाजसेवेसाठी झटणारे संतनगरी शेगावच्या गणेश घराण्यातील ज्ञानेश्वरदादा पाटील उपाख्य नाना यांना काँग्रेसने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवावी अशी मागणी आता घाटाखालील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागली आहे.

ज्ञानेश्वर दादा उर्फ नाना हे मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या संकटकाळात ठामपणे विरोधी पक्षाशी लढले आणि मोठ्या मताधिक्याने त्यांनी काँग्रेसची वोट बँक कायम ठेवली. त्यानंतर सुद्धा त्यांनी काँग्रेसचे संघटन वाढवले शेगावात भव्यदिव्य असा ओबीसी मेळावा घेतला तसेच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेसची विचारधारा घराघरात पोहोचली. आता काँग्रेसच्या नव्या धोरणानुसार नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी राजीनामा दिला आहे.
आता जिल्हाध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘राज्यात नाना आणि जिल्ह्यातही नाना’ अशी मागणी आता सुरू केली आहे.

खामगाव विधानसभा मतदार संघाचे नेते ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी घाटाखाली काँग्रेसची पक्ष बांधणी मजबूत केली आहे. नानांचा घाटाखाली व जिल्ह्यात आदरयुक्त दबदबा आहे तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक तसेच सर्वच वरिष्ठ नेत्यांशी नाना यांचे चांगले संबंध आहेत. शेगाव येथील गणेश घराण्याचा वारसा असल्याने जनमानसात त्यांना मानाचे स्थान आहे. त्यामुळे नाना यांना जिल्हाध्यक्ष पद मिळाले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच जिल्ह्यात काँग्रेसला चांगली बळकटी मिळू शकेल असे मत व्यक्त होत आहे. दरम्यान जिल्ह्यातील जुने पक्षश्रेष्ठी तसेच राज्यातील पक्षश्रेष्ठींकडून नाना यांचा जिल्हाध्यक्षपदासाठी विचार व्हावा अशी मागणी सर्वत्र जोर धरत आहे.