Home राज्य दै. ‘द रिपब्लिक’ च्या  बुलडाणा आवृत्ती संपादकपदी नारायण दाभाडे तर ‘डिजिटल’ चे...

दै. ‘द रिपब्लिक’ च्या  बुलडाणा आवृत्ती संपादकपदी नारायण दाभाडे तर ‘डिजिटल’ चे वृत्त संपादक राहुल निर्मळ

70

ओटीटी मीडिया

नागपूर : नागपूर येथील ऑन टाइम टुडे मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या द रिपब्लिक दैनिकाच्या बुलढाणा आवृत्ती संपादकपदी नारायण दाभाडे यांची तर द रिपब्लिक तथा ओटीटी डिजिटलच्या वृत्तसंपादकपदी राहुल निर्मळ यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Join us – 942323 7001

मराठी, हिंदी व इंग्रजी या प्रमुख तीन भाषांमध्ये नागपूर ओटीटी (On Time Today) मीडिया प्लॅटफॉर्मवर बातम्यांचे प्रसारण केले जाते.  या समूहाचा ओटीटी डिजिटल न्युज पेपर व वेब चैनल, तर द रिपब्लिक हे वर्तमानपत्र आणि ऑनलाइन न्युज पोर्टल आहे. ओटीटी माध्यम समूहाचे कार्पोरेट ऑफिस विश्वभारती सोसायटी ग्रँड कटारिया हॉल जवळ, रेवती नगर बेसा रोड नागपूर येथे असून बुलढाणा जिल्हा कार्यालय खामगाव व विभागीय कार्यालय शेगाव येथे आहे.
या माध्यम समूहाच्या द रिपब्लिक या दैनिकाची वर्षपूर्ती होत असून आता अकोला, वाशिम  व बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये दैनिकाच्या आवृत्तीचा विस्तार होणार आहे. द रिपब्लिक बुलढाणा आवृत्ती संपादकपदी जेष्ठ पत्रकार नारायण दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ओटीटी व रिपब्लिक डिजिटल च्या वृत्तसंपादक पदी युवा पत्रकार राहुल निर्मळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर येथील ऑन टाइम टुडे मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन श्रीधर ढगे पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. नवनियुक्त सहकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.