Home Breaking News पतीचे अपघाती निधन झालेल्या विधवेच्या कपाळी दिरानं भरलं कुंकू; वहिनीसह दोन मुलांना...

पतीचे अपघाती निधन झालेल्या विधवेच्या कपाळी दिरानं भरलं कुंकू; वहिनीसह दोन मुलांना दिला आधार!

82

संदीप सावळे

चिखली : पतीचं अपघाती निधन झाल्याने आधीच गरिबीची परिस्थिती असलेल्या एका महिलेवर दुःखाचा डोंगर कोसळला पतीच्या निधनानंतर दोन मुलांचा सांभाळ कसा करायचा, आणि संसाराचा गाडा कसा हाकायचा, असा यक्षप्रश्न तिच्या डोळ्यासमोर उभा होता..भविष्य अंधकारमय होते..काय करावे हेच सुचत नव्हते , मात्र तिच्या मदतीला ‘कृष्ण’ धावून आला..हा कृष्ण दुसरा तिसरा कुणी नसून तिचा दिरच. दिराने तिच्या कपाळी कुंकू भरलं आणि तिचा संसार सावरला. चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे हा आदर्श विवाह पार पडला आहे . डोंगर शेवली येथील येथील कृष्णा खेडवनकर या तरुणाने आपल्या विधवा वहिनी सोबत लग्न करून समाजा समोर आदर्श निर्माण केला आहे.

स्व. गणेश खेडवनकर यांचे काही वर्षापूर्वी मळणी यंत्रामध्ये जाऊन मुत्यु झाला होता, त्यांच्या पच्यात त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य आहेत, त्या दोन्ही मुलांची जबाबदारी ही त्यांच्या विधवा पत्नीवर आली होती, त्यात त्यांची घरची परिस्थिती हालाकीची असल्याने मुलांचा सांभाळ करने कठीण झाले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना त्यावेळी आर्थिक मदत देखील केली होती.

परंतु कमी वयात नवरा गेल्याने आता समोर काय? हा प्रश्न सर्वांन समोर उभा होता, त्यात कृष्णा खेडवनकर या तरुणाने समोर येऊन आपल्या विधवा वहिनी सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत करून त्यांचे लग्न सोमनाथ महाराज संस्थान डोंगरशेवली येथे लावून दिले.

खरोखरच कृष्णा खेडवनकर या तरुणाने समाज समोर आदर्श निर्माण करून दीला आहे. आपल्या विधवा वहिनी सोबत दोन्ही मुलांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारुन त्यांना आधार देण्याचे काम या तरुणाने केले आहे.
बाकी तरुणांनी देखील कृष्णा या तरुणाचा आदर्श घेतला पाहिजे.