Home Breaking News ६ जून रोजी आयोजित शिबिरात रक्तदान करून माणुसकी धर्म जपा – अमर...

६ जून रोजी आयोजित शिबिरात रक्तदान करून माणुसकी धर्म जपा – अमर रमेश पाटील

77

नांदुरा – येत्या ६ जून २०२२ ला छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करून माणुसकी धर्म जपा असे आवाहन संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नांदुरा तथा राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघ नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील यांनी केले.संभाजी ब्रिगेड नांदुरा द्वारे दरवर्षी ६ जून ला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यामधे दरवर्षी रक्तदाते रक्तदानाच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत रक्तदान करतात.तसेच संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून नांदुरा येथे रक्तदान शिबिराचे हे तिसरे वर्ष असून निरंतर हे रक्तदान शिबिर घेऊन व गरजू रुगांना रक्तसेवा व सामाजिक कार्य सतत करत राहणार असे अमर रमेश पाटील यांनी सांगितले

रक्तदान का करावे❓
रक्तदान केल्याने आपल्या शरीरातील रक्त पातळ होऊन हृदयविकाराच्या झटक्या पासून वाचता येते,नवीन रक्त पेशा निर्माण होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते,रक्तदान केल्यावर आपल्या रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या होतात ज्यामधे आपल्याला कुठला आजार आहे का हे लवकर कळते त्यामुळे वेळेत योग्य तो इलाज घेतल्यास आजार आटोक्यात येतो,शरीर निरोगी व मन आनंदी राहते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपले रक्त कोणाचे तरी प्राण वाचविते यामुळे एक चांगल काम आपल्या हातून होते.विशेष म्हणजे हे रक्त शासकीय रक्तपेढीला देण्यात येते ज्यामुळे खरोखर गरजू रुग्णांना रक्त मिळते व आपल्याला रक्तदानाचे शासकीय प्रमाणपत्र मिळते

रक्तदान शिबिर दिनांक ६ जून २०२२
स्थळ श्री संत सावता माळी भवन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ नांदुरा
वेळ सकाळी ०९ ते ०२