Home Breaking News नाफेडचे पोर्टल बंद;शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा!राज्य शासनाने तोडगा काढावा-अँड खुमकर

नाफेडचे पोर्टल बंद;शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा!राज्य शासनाने तोडगा काढावा-अँड खुमकर

87

 

१८ जूनपर्यंत मुदतवाढ प्रत्यक्षात मात्र २ जून रोजी खरेदी बंद; शेतकऱ्यांमध्ये संताप

अकोला-नुकतीच शासकीय हरभरा खरेदीला १८ जून पर्यंत मुदतवाढ मिळाल्याचे पत्र राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागाने जारी केले. मात्र काल २ जून रोजी नाफेडचे पोर्टल पुन्हा बंद करण्यात आल्याने हजारो क्विंटल हरभरा शेतकऱ्यांकडे पडून आहे.त्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण पुढे करत नाफेडमार्फत सुरू असलेली हरभरा खरेदी मुदतीपूर्वी २३ मे रोजी पूर्वसूचना न देता बंद केली होती. ५ हजार २३० रुपये हमीभाव असताना शेतकऱ्यांना खासगी बाजारात हमी भावापेक्षा ८०० ते १००० रुपयांनी कमी भावात विक्री करावी लागली.मात्र याबाबत शासनाकडे अनेक राजकिय पक्षांनी पाठपुरावा केला असल्याने १८ जून पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.पण त्यावरही आता पाणी फेरले असून २ जून रोजी पोर्टल बंद करून खरेदी प्रक्रिया पुन्हा बंद करण्यात आली आहे.नैसर्गिक संकटामुळे आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत आला असतांना आत नाफेडची हरभरा खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
———
शेकडो शेतकऱ्यांची नोंदणी धान्य पडून

हमी भावाने विक्री केल्यास दोन पैशाची आशा ठेवून शेतकरी विक्री साठी नोंदणी करतात. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी नाफेड हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे.यापैकी बहुतांश शेतकऱ्यांना मॅसेज जरी आले तरी मात्र अजूनही त्यांच्या मालाचे मोजमाप झाले नसल्याने हजारो क्विंटल धान्य पडून आहे.
————
राज्य शासनाने तोडगा काढावा-अँड खुमकर

शेतकऱ्यांच्या घरात हजारो क्विंटल हरभरा पडून आहे.शिवाय खरीप हंगाम समोर असल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.अशा परिस्थितीत केंद्र शासनाने नाफेडचे पोर्टल बंद जरी केले असले तरी राज्य शासनाने यावर तोडगा काढावा अशी प्रतिक्रिया प्रहारचे जिल्हाप्रमुख अँड सुधाकर खुमकर यांनी ‘द रिपब्लिक’शी बोलतांना दिली.
———–