Home Breaking News तेजेंद्रसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनारायन कॉलेजचा उज्वल निकाल

तेजेंद्रसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनारायन कॉलेजचा उज्वल निकाल

90

लक्ष्मीनारायण जुनियर कॉलेज ची स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम

 

खामगाव : “विद्यार्थ्यांच्या अंगी सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना सातत्यपूर्ण शिक्षण देणे, हेच आमच्या यशाचे गमक आहे.” असे प्रतिपादन तेजेंद्रसिंह चौहान यांनी १२वीच्या निकाल लागल्यानंतर व्यक्त केले. लक्ष्मीनारायण जुनियर कॉलेज च्या स्थापनेपासून सुरू असलेली १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम असून महाविद्यालयातील कला, विज्ञान व वाणिज्य (इंग्रजी व मराठी माध्यम) शाखेतील तब्बल ११६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य श्रेणीतील गुण घेत बाजी मारली आहे. तसेच ५०च्या वर विद्यार्थ्यानी प्रथम क्ष्रेणी मध्ये गुण घेत उत्तीर्ण झालेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याला वळण देणारा १२वीचा निकाल आज जाहीर झाला, यामध्ये श्री. लक्ष्मीनारायण ग्रुप द्वारा संचालित लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल जुनियर कॉलेज चा निकाल यावर्षी सुद्धा १०० टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतील अनुष्का सचिन राणे हिने ९२.१७ टक्के गुण घेत प्रथम क्रमांक पटकाविला, ध्रुव राजेश केडिया याने ९२ टक्के गुण घेत दूसरा क्रमांक पटकाविला तर रुषभ रमेश बोंडे याने ९१.३३ टक्के गुण घेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. वाणिज्य शाखेतून कु. रुचिका अजयकुमार नथ्थणी हिने ९४.१७ टक्के गुण घेत प्रथम क्रमांक पटकाविला, कु. खुशी संजय शर्मा हिने ९३.६७ टक्के गुण घेत दूसरा क्रमांक पटकाविला तर कु. स्नेहा संतोष शर्मा व कु. धनश्री दशरथ आखूड यांनी संयुक्त रित्या ९२.८३ टक्के गुण घेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. कला शाखेतून कु. निकिता मुकिंदा खंडेराव हिने ७३.३३ टक्के गुण घेत प्रथम क्रमांक राखला, आकाश सहदेव रेवस्कर याने ६७.६७ गुण घेत दूसरा क्रमांक तर कु. संजना ज्ञानेश्वर काळे हिने ६५.५० गुण घेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. यांच्या सोबतच तब्बल महाविद्यालयातील ११६ विद्यार्थ्यानी ७५ टक्के पेक्षा जेस्त गुण घेत विशेष प्रावीण्य श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहे.
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री. तेजेंद्रसिंह चौहान, संचालिका सौ. राजकुमारी चौहान व प्राचार्य राहुल अग्रवाल यांनी कौतुक करून अभिनंद केले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.