Home Breaking News बांधकाम विभागाच्या अभियंता प्रियंका पांडे यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना

बांधकाम विभागाच्या अभियंता प्रियंका पांडे यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना

78

तहसील कार्यालयास स्वागत कक्ष इमारत देण्यास टाळाटाळ !

शेगाव – येथील तहसिल कार्यालयाची इमारत शिकस्त झालेली आहे. तहसीलकरिता शेगाव विश्रामगृह समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वागत कक्ष ही इमारत देण्यात यावी, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता प्रियंका पांडे यांनी या आदेशाची अवहेलना करत तहसील कार्यालयास स्वागत कक्ष इमारत देण्यास टाळाटाळ सुरू केली असल्याचा आरोप महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे.

शेगाव येथील तहसील कार्यालयाची इमारत अत्यंत जुनी असून मोडकळीस आलेली आहे. तहसिल कार्यालयाचे नविन इमारत बांधकाम करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याकरीता जुन्या तहसिल कार्यालयाची संपुर्ण इमारत निष्कशित केल्याशिवाय प्रत्यक्ष नविन कामास सुरुवात होऊ शकत नाही. नविन इमारतीचे बांधकाम पुर्ण होईपर्यंत तहसिल कार्यालयाचे कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरुपात जागेची आवश्यकता आहे. शेगांव शहरात दुसरी शासकीय इमारत उपलब्ध नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी अंतर्गत स्वागत कक्षाची इमारत तहसिल कार्यालयाचे कामकाजाकरीता हस्तांतरीत करण्यात यावी असा आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केलेला आहे.
हा लेखी आदेश संबंधित विभागांना देण्यात आला असला तरी शेगाव तहसीलला स्वागत कक्षाची इमारत देण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता प्रियंका पांडे चालढकल करत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.

म्हणे टाऊन हॉल मध्ये जा!

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश असताना तो न जुमानता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भाग्यवंता प्रियंका पांडे यांनी तहसील कार्यालय बसस्थानकाजवळील टाऊन हॉलमध्ये स्थानातरित करावे असा अफलातून प्रस्ताव ठेवला आहे. सदर तहसीलसाठी योग्य नसल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे.

चौकट…
शेगाव तहसील कार्यालयाची इमारत अत्यंत शिकस्त झालेली असल्याने नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. तोपर्यंत आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वागत पक्षाची तहसीलच्या बाजूलाच असलेली इमारत सोयीची आहे. ही इमारत देण्याबाबत जिल्हाधिकारी साहेबांनी स्पष्ट आदेश दिले असतानाही संबंधित विभागाच्या कडून चालढकल करण्यात येत आहे.

-पी जे पवार
तालुकाध्यक्ष
महसुल कर्मचारी संघटना


शेगाव तहसील नवीन जागेत स्थानांतरित करण्यात येत असून जवळच असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्वागतकक्षात ही इमारत गेल्यास नागरिकांना सोयीचे होईल. कारण तहसील परिसर हा सर्वांच्या परिचयाचा व सोईचा आहे. न्यायालय, पोलीस स्टेशन सुद्धा बाजूलाच आहे. त्यामुळे पक्षकारांना सुद्धा सोयीचे होईल तरी स्वागत कक्षातच ही इमारत स्थानांतरित करावी अशी आमची मागणी आहे.

ऍड. जी. एस. पाटील
जेष्ठ विधीज्ञ शेगाव न्यायालय