Home Breaking News अँड. मिराताई माहुलीकर यांनी साजरी केली आगळीवेगळी वटपौर्णिमा

अँड. मिराताई माहुलीकर यांनी साजरी केली आगळीवेगळी वटपौर्णिमा

72

 

खामगाव – वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, या दिवशी महिला वटवृक्षाची विधिवत पूजा करतात आणि सात जन्मी हाच पती मिळावा असे वरदान मागतात.
एक पौराणिक कथा आहे सत्यवान आणि सावित्रीची. त्या कथेचा आधार घेत पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच जन्मोजन्मी हाच पती मिळावा हे वरदान मिळवण्यासाठी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो.

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे तसेच हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. मात्र खामगाव शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. येथील सामाजिक कार्यकर्त्या मीराताई बावस्कार – माहुलीकर यांच्या पुढाकारातून वट पौर्णिमेच्या निमित्ताने वट वृक्षाची दिवे अगरबत्ती लाऊन पूजा न करता आणखी एक वट वृक्ष लावण्याचा निश्चय केला गेला. श्री बालाजी मल्टीपर्पझ फाउंडेशनतर्फे सामाजिक वनीकरण प्रकल्प जनूना येथे वट वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच वट पौर्णिमा महिलांनी वृक्ष रोपण करूनच साजरी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी जनूना येथील संजीवनी शिरस्कार, राखी राजपूत, दिपाली कोळसे, सरिता शेजव , नसरिण पठाण, शोभा हरमकर , कविता गुरेकर कल्पना गुरेकर, अनिता खंडेराव,आचल शेजव इत्यादी उपस्थित होते.