Home Breaking News संभाजीराजे छत्रपती यांनी केलं महाराष्ट्रातील जनतेला ‘स्वराज्य’ पक्षाला बोधचिन्ह सूचवण्याचं आवाहन

संभाजीराजे छत्रपती यांनी केलं महाराष्ट्रातील जनतेला ‘स्वराज्य’ पक्षाला बोधचिन्ह सूचवण्याचं आवाहन

97

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे यांनी स्वाभीमानाने माघार घेतली होती आता त्यांनी नवीन पक्ष स्थापण केला आहे निवडणुकीपूर्वी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ‘स्वराज्य’ पक्षाची स्थापना केली. आता स्वराज्य पक्षाचं बोधचिन्ह जनतेच्या कल्पनेतून साकारणार असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. आज संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्ट करत महाराष्ट्रातील जनतेला ‘स्वराज्य’ पक्षाला बोधचिन्ह सूचवण्याचं आवाहन केलं आहे.

“विस्थापित मावळ्यांना संघटित करून जनतेच्या मनातलं ‘स्वराज्य’ आणण्यासाठी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेचे अधिकृत बोधचिन्ह म्हणजेच लोगो जनतेच्याच संकल्पनेतून साकारावं, अशी आमची इच्छा आहे. ते बोधचिन्ह सुचवा”, असं आवाहन संभाजीराजे यांनी केलं आहे.

‘हे बोधचिन्ह सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारे असे स्वराज्य संघटनेची ओळख असेल. ज्यांनी तयार केलेले बोधचिन्ह ‘स्वराज्य’चे अधिकृत बोधचिन्ह म्हणून स्वीकारले जाईल, त्यांस छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल’. असं संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

जर तुम्ही सुद्धा संभाजीराजेंच्या ‘स्वराज्य’ साठी वापरलं जाणार बोधचिन्ह सूचवण्यास उत्सुक असाल तर, तुम्ही तयार केलेलं बोधचिन्ह तुम्ही What’s APP करू शकता त्यासाठी संभाजीराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये एक नंबर दिला आहे. त्यावर तुम्ही तयार केलेलं बोधचिन्ह पाठवता येईल.

असे आहे आवाहन

• बोधचिन्ह हे लक्षवेधी व संस्मरणीय असावे. ते फार क्लिष्ट असू नये.

• बोधचिन्ह हे रेडियम प्रिंट, ग्राफिक प्रिंट अशा कोणत्याही स्वरूपात वापरण्यास सोयीस्कर असावे.

• एकदा बोधचिन्ह स्वीकृत केल्यानंतर त्यावर पूर्ण अधिकार हा स्वराज्य संघटनेचा असेल.

• एखाद्या बोधचिन्हाची संकल्पना आवडल्यास ते स्वीकृत केल्यानंतर, त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचे अधिकार स्वराज्य संघटनेकडे असतील.

हे बोधचिन्ह सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारे असे स्वराज्य संघटनेची ओळख असेल. तरी, कल्पक मंडळींना आमचे आवाहन आहे की, असे बोधचिन्ह तयार करून खाली दिलेल्या व्हॉट्स ॲप नंबर वरती पाठवून द्यावे. ज्यांनी तयार केलेले बोधचिन्ह ‘स्वराज्य’चे अधिकृत बोधचिन्ह म्हणून स्वीकारले जाईल, त्यांस छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल.

बोधचिन्ह पाठविण्यासाठी तात्पुरता व्हॉट्स ॲप नंबर : 9403788699

• कृपया जास्तीतजास्त सोमवार, दि. २० जून पर्यंत बोधचिन्ह पाठवून सहकार्य करावे.