Home Breaking News बासिंग बांधून नवरदेव थेट बार मध्ये; यालाच म्हणतात शोक बडी चीज

बासिंग बांधून नवरदेव थेट बार मध्ये; यालाच म्हणतात शोक बडी चीज

99

 

बुलडाणा – नवरदेव – नवरी आपल्या स्वतःच्या लग्नात विविध फंडे वापरत असल्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतांना आपण पाहत असतो, मात्र बुलडाणा जिल्ह्यातील एक नवरदेव कपाळावर बासिंग बांधून थेट वाईन बार मध्ये पेग मारतांना दिसला…

अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेल्याची परिस्थिती आहे, ओठावर मिसरूड देखील आली नसलेले, आणि नुकतेच वयात आलेली मुले देखील आता वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करत असल्याचे देखील अनेक घटनेवरून दिसून येते… आणि अलीकडच्या काळामध्ये लग्नसमारंभ असो की वाढदिवस अशा अनेक कार्यक्रमांमध्ये दारू पिण्याचा तर प्रकारे ट्रेंड झालाय…

लग्न समारंभ म्हटला की नवरदेवा कडून त्याची मित्रमंडळी हक्काने दारूची व्यवस्था करून घेतात… आणि नवरदेवही लग्नाच्या आनंदात त्यांची सगळी व्यवस्था करतात… मात्र लग्न लावून आलेला नवरदेव थेट बियर बार मध्ये जाऊन पेग मारताना दिसून आलाय, खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी फाट्यावरील एका बियर बार मध्ये नवरदेव रात्री आठ वाजता कपाळावर बाशिंग बांधून आला,आणि दारूचा पेग मारला, त्यामुळे त्याला पाहून सर्वजण अचंबित झाले होते…
यावरूनच नवीन पिढी किती व्यसनाधीन झाली आहे हे दिसून येते…त्यांना किमान लग्नाची हळद उतरेपर्यंत हे धीर राहिला नाही…