Home Breaking News पोलिस अधीक्षक दिलीप पाटिल यांचा त्रास असल्याची सुसाईड नोट! जमादाराची आत्महत्या

पोलिस अधीक्षक दिलीप पाटिल यांचा त्रास असल्याची सुसाईड नोट! जमादाराची आत्महत्या

88

 

यवतमाळ : जिल्ह्यात जमादाराच्या आत्महत्येने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. विष्णू कोरडे या जमादाराने आज पोलीस अधीक्षक यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. तशी सुसाईड नोट त्यांनी लिहिली असल्याच समोर आलंय. विष्‍णू कोरडे हे जमादार यवतमाळ पोलीस विभागात कार्यरत आहेत.

हीच ती सुसाईड नोट

यवतमाळ चे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे अशी चिठ्ठी लिहून लक्ष्मी नगर येथील राहत्या घरी लुंगी ने गळफास घेऊन कोरडे यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. माझ्या मरणोपरांत माझ्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल अशी भावनिक मागणी सुसाईड नोटमध्ये विष्णू कोरडे यांनी केली आसल्याच दिसून येत आहे. पोलीस अधीक्षकांवर आरोप करीत जमादाने आत्महत्या केल्याने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. उल्लेखनीय आहे की डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ हे बुलढाणा येथे सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते