Home Breaking News मोठी बातमी ! 2 देशी कट्टया सह 4 आरोपी अटक

मोठी बातमी ! 2 देशी कट्टया सह 4 आरोपी अटक

91

 

जळगाव जामोद – बर्‍हाणपूर मार्गावर नाकाबंदी दरम्यान जळगाव जामोद पोलिसाच्या पथकाने एका कारची झडती घेतली असता त्यात 2 देशी कट्टे आढळून आले. या वाहनात बसलेल्या 4 जणांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे. चारही आरोपी कराड, जिल्हा सातारा येथील असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती जळगाव जामोदचे ठाणेदार अनिल आंबुलकर यांनी दिली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मा पोलीस अधिक्षक सा बुलडाणा यांचे संपुर्ण जिल्हयात अचानक नाकबंदी करण्याचे आदेश असतांना त्या अनुशंगाने दिनांक 16/6/22 रोजी 05.00 वाजताचे सुमारास जळगांव जामोद ते ब-हाणपुर रोडवर निमखेडी फाटयावर अचानक नाकाबंदी करीत असतांना एक लालरंगाची तवेरा गाडी आली सदर गाडीला थांबवुन तीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये परशुराम रमेश करवले वय 23 रा. सोमवार पेठ कराड जि.सातारा 2. अभिजित दिलीप येडगे वय 19 रा. अहिल्ल्यानगर मलकापुर ता कराड जि. सातारा 3 दिनेश विजय बुरूंगले वय 22 रा.सातारा 4. कुनाल बाबुराव हिवरे वय 23 रा. रेहटे ता कराड जिल्हा सातारा हे मिळुन आले त्यांचे ताब्यातुन दोन देशी बनावटीचे पिस्टल, मोबाईल एक तवेरा गाडी क्र. एमएच 11 एल 9594 असा एकुण 601500/- रू चा माल मिळुन आला सदरचा मुददेमाल जप्त करण्यात आला अधिक तपासा करीता आरोपीतांना मात्र न्यायालयात आज रोजी हजर करण्यात आले आहे. सदर कारवाई मा. अपर पोलीस अधिक्षक श्री श्रवण दत्त साहेब, खामगांव यांचे मार्गदर्शन खाली ठाणेदार सुनिल अंबुलकर, पोउपनि किशोर घोडेस्वार, पोहेकॉ निलेश पुंडे, नापोका उमेश शेगोकार, पोकॉ अमोल वनारे, पोकॉ सचीन राजपुत पोकॉ प्रशांत डामरे, चालक पोकॉ सुनिल वावगे यांनी केलेली आहे.