Home Breaking News श्री संत भोजने महाराज दिंडी रविवारी पंढरपूर कडे प्रस्थान

श्री संत भोजने महाराज दिंडी रविवारी पंढरपूर कडे प्रस्थान

89

 

श्री क्षेत्र अटाळी :  श्री विठठल रुख्माई सदगुरु भोजने महाराज संस्थान श्री क्षेत्र अटाळी ता.खामगांव येथून जेष्ठ व 6 रविवार दि.19 जून रोजी श्री क्षेत्र अटाळी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदळ वारी दिंडी सकाळी 8.00 वा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

खामगांव मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर अध्यक्ष असलेले खामगांव तालुक्यातील श्री क्षेत्र अटाळी ता.खामगांव येथून आषाढी एकादशी निमीत्य मागील 15 वर्षापासून पंढरपूर कडे पायदळ वारी दिंडी जात असते. या दिडींत अटाळी व पंचक्रोशीतील वारकरी विठठलाचा जयघोष करीत पंढरपूरला जातात. सदरची दिंडी रविवार दि.19 जून रोजी सकाळी 8 वाजता श्री क्षेत्र विठठल रुख्माई सदगुरु भोजने महाराज संस्थान येथून प्रस्थान करणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी श्री संत भोजने महाराज पालखीसाठी नवीन रथ तयार करण्यात आला आहे. हा रथ देखील यादिंडीत सहभागी होणार आहे.

 

सदरची दिंडी देऊळगांव साकर्शा, जानेफळ,मेहकर, लोणार,तळेगांव, गेवराई, साटोणा, आष्टी,सादोळा, पातृड, कळंब, येरमाळा,जामगांव, खांडवी,भोसारे, या मार्गे पंढरपूर येथे दि.7 जुलै 2022 रोजी पंढरपूर येथे पोहचणार आहे. या दिंडीत शेकडो पायदळ वारी करणारे वारकरी सहभागी होणार आहेत.