Home चंद्रपूर @ Ballarpur taluka news नँशनल रेलवे मजदूर यूनियन तर्फे बल्लारपुरात एक...

@ Ballarpur taluka news नँशनल रेलवे मजदूर यूनियन तर्फे बल्लारपुरात एक दिवसाचा उपोषण

173

@ Ballarpur taluka news

नँशनल रेलवे मजदूर यूनियन तर्फे बल्लारपुरात एक दिवसाचा उपोषण

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

बल्लारपुर:नॅशनल रेल्वे मजदूर युनियन बल्लारपूर व वरोरा रेल्वे कर्मचारी यांच्या वतीने एक दिवसीय भुक हडताल करण्यात आली.
याप्रसंगी त्यांनी अनेक मागण्या ठेवत. त्यामध्ये नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करणे. रेल्वेत होत असलेले काही ठिकाणाचे खाजगीकरण त्वरित थांबवावे.

रेल्वेत रिक्त असलेल्या जागा त्वरित भराव्या अशा अनेक मागण्यांना घेऊन नॅशनल रेल्वे मजदूर युनियन बल्लारशा वरोरा चे कर्मचारी एक दिवसीय उपोषणाला बसलेले आहे.

यावेळी अन्नम व्यंकटेश, मन्नाम वेंकटेश,के. के. सेन, मनोज पाटील,आशिष लेडांगे, विरेंद्र सिंग,विजय बायतूले, नितीन काकडे, कामरेड कालिदास, संतोष वाजपायी उपस्थित होते.