Home Breaking News Visapur@ grampanchayat news चुनाभट्टीवासियांचा स्वच्छतेचा सुगंध पंचक्रोशीत दरवळत राहो! भारतीय...

Visapur@ grampanchayat news चुनाभट्टीवासियांचा स्वच्छतेचा सुगंध पंचक्रोशीत दरवळत राहो! भारतीय दुतावास सेवेतील डाँ. विनोद बहादे यांचे प्रतिपादन दीपोत्सव कार्यक्रमात छतिसगडी लोककलेचा नृत्याविष्काराने केले मंत्रमुग्ध

118

Visapur@ grampanchayat news

चुनाभट्टीवासियांचा स्वच्छतेचा सुगंध पंचक्रोशीत दरवळत राहो!

भारतीय दुतावास सेवेतील डाँ. विनोद बहादे यांचे प्रतिपादन

दीपोत्सव कार्यक्रमात छतिसगडी लोककलेचा नृत्याविष्काराने केले मंत्रमुग्ध

सुवर्ण भारत:शंकर महाकाली(मुख्यसंपादक)

विसापूर ( बल्लारपूर ): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ग्रामीण संस्कृती संदर्भात अनन्य साधारण महत्व विषद केले. म्हणून त्यांनी नागरिकांना खेड्याकडे चला, म्हणून संदेश दिला. मात्र त्यांच्या संदेशाकडे आपले दुर्लक्ष झाले. आजघडीला स्वच्छ व सुंदर शहर व गावाची संकल्पना साकारली जात आहे.

याकडे आपण डोळेझाक करत आहे. आपल्या जीवनात स्वच्छता फार महत्वाची आहे. मग ती घरांची, परिसराची अथवा सार्वजनिक स्वच्छता असो. याचे प्रतिबिंब चुनाभट्टी वस्तीत उमटून दिसत आहे.

चुनाभट्टीवासियांचा स्वच्छतेचा सुगंध पंचक्रोशीत व जिल्हाभरात दरवळत राहो, असे प्रतिपादन भारतीय दुतावास सेवेतील अधिकारी, आयएएस डाँ. विनोद बहादे यांनी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर हद्दीतील चुनाभट्टी येथील स्नेहमीलन व दीपोत्सव कार्यक्रमात केले.

‘ तमसो मा ज्योतीगर्मय ‘अर्थात अंधाराकडून प्रकाशाकडे ने असाच दीपोत्सवाचा संदेश आहे.चुनाभट्टी येथील गरिबांच्या वस्तीला झळाळी यावी.छतीसगडी व आदिवासी बांधवासोबत दिवाळी साजरी करावी.

मजुराशी आपुलकीचे नाते जोपासत विसापूर येथील माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य व चंद्रपूर बाजार समितीचे माजी सभापती रामभाऊ टोंगे यांच्या मार्फत दोन वर्षांपासून चुनाभट्टी वस्तीत दीपोत्सवाचे औचित्य साधून स्नेहमीलन व स्नेहभोजन तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डाँ. विनोद बहादे यांनी आपल्या भावनेला मोकळी वाट केली. दरम्यान छतीसगडी व गोंडी नृत्यविष्काराने दिवाळीच्या पाडव्यात गोडवा निर्माण करून साऱ्यांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय दुतावास सेवेतील अधिकारी डाँ. विनोद बहादे, पत्रकार राजेश भोजेकर, बामणीचे सरपंच सुभाष ताजने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव व समाजसेवक शरद राजने, आयोजक रामभाऊ टोंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय टोंगे, विसापूरच्या सरपंच वर्षा कुळमेथे यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर – बल्लारपूर राज्य महामार्गाच्या पूर्व दिशेला चार दशकापासून दीडशेच्या आसपास छतीसगडी व आदिवासी मजुरांची वस्ती आहे. एका प्रकारची झोपडपट्टी आहे.

मात्र येथील घरांची रचनात्मक स्वच्छता रोजच दिवाळी सणाची जाणीव करून देणारी आहे.ज्यांचे रोजचे उदरनिर्व्हाचे साधन केवळ मजुरी. मात्र येथील नावीन्यपूर्ण स्वच्छता मनमोहून टाकणारी आहे.मराठी मुलखातला दिवाळी चुनाभट्टी वस्तीत अनोखा भासतो.

येथील लहान थोरापासून तरुणासोबत दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना विसापूर येथील रामभाऊ टोंगे यांनी रुजवली आहे.माणूस अंधार – प्रकाश,दुःख -सुख,तृष्णा – शांती,क्रोध – आनंद या द्वद्ववात जगत आहे.या जगण्याला माणुसकीची जोड मिळावी. छतिसगडी व आदिवासी मजुरांना आपली माणसं वाटावी. या हेतूने आयोजित दीपोत्सव सणानिमित्त स्नेहमीलन व स्नेहभोजन सोहळा अविस्मरणीय ठरला आहे.

दरम्यान चुनाभट्टी येथील जेष्ठ नागरिक कैलास चिट्टलवार, राधेलाल कतलाम, रामकिसन केकती, अपंग अंबदास आत्राम, गौचरण नाग, अनाथ मुलगी यांच्यासह छतिसगडी व आदिवासी मुलींनी नृत्याविष्कार करून छतिसगडी संस्कृतीचे दर्शन घडविल्याबद्दल सर्व कलावंताचे शाल, पुष्प गुच्छ व स्मुर्तीचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले.