Home Breaking News Chandrapur@S.T bus news जेष्ठ नागरिक व दिव्यांगांची ही थट्टाच ! ...

Chandrapur@S.T bus news जेष्ठ नागरिक व दिव्यांगांची ही थट्टाच ! स्मार्ट कार्ड अद्याप आले नाही त्यांच्या हातात ? सर्वत्र सुरू झाली आता नागरिकांची ओरड !

348

Chandrapur@S.T bus news

जेष्ठ नागरिक व दिव्यांगांची ही थट्टाच !

स्मार्ट कार्ड अद्याप आले नाही त्यांच्या हातात ?

सर्वत्र सुरू झाली आता नागरिकांची ओरड !

सुवर्ण भारत: ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

चंद्रपूर : राज्यपरिवहन महामंडळाच्या तिकीट सवलतीत दिव्यांग व्यक्ती व जेष्ठ नागरिकांचा समावेश केलेला आहे .या तिकीट सवलतीचे लाभार्थीं मोठ्या आतुरतेने स्मार्ट कार्डची वाट बघत आहे.

घोषणाबाजी नुसार या सवलती अंतर्गत येणांऱ्या व्यक्तींनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले परंतु अजून पर्यंत त्यांना या स्मार्ट कार्ड पासून वंचित राहावे लागले ही वस्तुस्थिती आहे.

राजुरा आगारात भेटी अंती एका दिव्यांग व्यक्तीने दि .18/6/2022ला राजिस्ट्रेशन केले.या शिवाय इतर जेष्ठ नागरिकांनी देखिल रजिस्ट्रेशन केले .आज 4 महिन्यांचा कालावधी होऊनही सुद्धा त्यांना स्मार्ट कार्ड मिळाले नसल्याचे दिसून आले .या बाबतीत जिल्हा भर जेष्ठ नागरिकांत अशीच ओरड सुरू आहे.

संबंधित लाभार्थींनी या बाबत कुठे चौकशी करावी किंवा कुणाकडे दाद मागावी हा प्रश्न त्यांना पडला असुन वरील स्मार्ट कार्ड बाबत जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचा-यां कडून त्यांना समाधान कारक उत्तर मिळत नसल्याचे एका जेष्ठ नागरिकाने या प्रतिनिधिस चंद्रपूर मुक्कामी काल सांगितले.