Home Breaking News राहुल गांधिंची भारत जोडो यात्रा देशातील घटनात्मक पाया मजबूत करण्यासाठी काँग्रेस...

राहुल गांधिंची भारत जोडो यात्रा देशातील घटनात्मक पाया मजबूत करण्यासाठी काँग्रेस नेते मुकूल वासनिक यांचे प्रतिपादन चंद्रपुरात भारत जोडो यात्रासंदर्भात आढावा बैठक

159

Chandrapur@ city news

राहुल गांधिंची भारत जोडो यात्रा देशातील घटनात्मक पाया मजबूत करण्यासाठी

काँग्रेस नेते मुकूल वासनिक यांचे प्रतिपादन

चंद्रपुरात भारत जोडो यात्रासंदर्भात आढावा बैठक

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

चंद्रपूर:भाजप व आरएसएस ने देशातील घटनात्मक दर्जा पायदळी तुडविण्याचे कारस्थान रचले आहे.हा आघात काँग्रेस सहन करणार नाही.संविधानात्मक चौकट उध्वस्त होत आहे. यामुळे देशात सौहार्दाचे वातावरण बिघडत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा ५० दिवसापूर्वी सुरु झाली. तीन राज्य भारत जोडो यात्रेनी पुर्ण केले. कन्याकुमारी पासून काश्मिर पर्यंत ३५०० किलोमीटरचे अंतर भारत जोडो यात्रा पूर्ण करणार आहे. ऐतिहासिक भारत जोडो यात्रेत आपलाही सहभाग असावा.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देशातील घटनात्मक पाया टिकविण्यासाठी असून देशात सौहार्द निर्माण करण्यासाठी आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसच्या सुकाणू समितीचे सदस्य खासदार मुकूल वासनिक यांनी सोमवारी चंद्रपूर येथे केले.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस, काँग्रेस सेवादल, महिला काँग्रेस, एनएसयूआय, युवक काँग्रेस व सहयोगी संघटनेच्या वतीने चंद्रपूर येथे भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्यात प्रवेश केल्यावर नियोजन आढावा बैठक एका हाँटेल मध्ये सोमवारी पार पडली.
या बैठकीत मार्गदर्शक म्हणून काँग्रेस नेते खासदार मुकूल वासनिक बोलत होते.
यावेळी खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर, राजुराचे आमदार सुभाष धोटे, भद्रावतीच्या आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार अविनाश वारजूरकर, काँग्रेस नेते नाना गावंडे, मुजीब पठाण, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर अध्यक्ष रितेश ( रामू )तिवारी, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नम्रता ठेमस्कार, सेवादल अध्यक्ष सूर्यकांत खनके, प्रकाश मारकवार, विनायक बांगडे, सुभाष गौर, सोहेल शेख, राजेश अड्डर आदींची उपस्थिती होती.
खासदार मुकूल वासनिक म्हणाले, या महिन्यात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्हातून जाणार आहे.
या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत गैर राजकीय, सामाजिक संघटना व भारत प्रेमी संघटना सहभागी झाल्या आहेत. आपणही स्वईच्छेने जेवढे अंतर पदयात्रेत चालता येईल, अशांनी भारत जोडो यात्रेला सहकार्य करावे. या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेचा भाग व्हावा, असेही खासदार वासनिक यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, खासदार बाळू धानोरकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान देशाचे माजी गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ त्यांच्या प्रतिमेला मालार्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. प्रास्ताविक प्रकाश देवतळे यांनी केले. यावेळी जिल्हाभरातील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.