Home Breaking News Chandrapur @congress parti news किसान मजदूर कॉंग्रेस जि.चंद्रपूरच्या वतीने राष्ट्रमाता प्रियदर्शिनी...

Chandrapur @congress parti news किसान मजदूर कॉंग्रेस जि.चंद्रपूरच्या वतीने राष्ट्रमाता प्रियदर्शिनी इंदिराजी गांधी यांच्या पुण्य- स्मरण -दिवस कार्यक्रम कॉग्रेसचे नेते माजी खा. नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात संपन्न

227

Chandrapur @congess parti news

• विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस जि.चंद्रपूरच्या वतीने राष्ट्रमाता

• प्रियदर्शिनी इंदिराजी गांधी यांच्या पुण्य- स्मरण -दिवस कार्यक्रम कॉग्रेसचे नेते माजी खा. नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात संपन्न

सुवर्ण महाराष्ट्र:चेतन गेडाम(उपसंपादक)

सुवर्ण महाराष्ट्र:चंद्रपूर ( दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ )
काँग्रेसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वप्रधान मार्गदर्शनात व युवा नेते राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात आज सोमवार दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२२ रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान राष्ट्रमाता श्रीमती इंदिराजी गांधी यांचा पुण्य स्मरण दिवस कार्यक्रम पार पडला. प्रियदर्शिनी चौक चंद्रपूर येथील श्रीमती इंदिराजींच्या पुतळा परिसरात विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस जि. चंद्रपूरच्या वतीने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला युवा नेते राहुल पुगलिया यांच्या शुभहस्ते राष्ट्रमाता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
यानंतर सामूहिक सलामी देण्यात आली. उपस्थित सर्वांनीच पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली व दोन मिनिटे मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गजाननराव गावडे (गुरुजी) यांनी प्रसंगोचित मार्गदर्शन केले. इंदिराजी, अमर रहे” चे नारे लावून कार्यक्रमाचे विसर्जन झाले. याप्रसंगी विदर्भ किसान मजदूर कॉग्रेसचे जिल्हा महासचिव श्री अँड. अविनाश ठावरी, जिल्हा
महासचिव तथा माजी नगरसेवक,अशोक नागापूरे, शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक,देवेंद्र बेले, चंद्रपूर नगरपरिषदचे माजी उपाध्यक्ष अरुण बुरडकर, नगरपरिषदचे माजी उपाध्यक्ष अँड. विजयराव मोगरे, माजी जिल्हापरिषद सदस्य रामभाऊ टोंगे, युवक कॉग्रेसचे चंद्रपूर शहर उपाध्यक्ष स्वप्नील तिवारी, दुर्गेश चौबे, मजदूर कॉग्रेसचे रामदास वान्दरकर, तारासिंग क्लसी, गजानन दिवसे,अनिल तूगीडवार, माजी नगरसेविका श्रीमती रत्नमाला बावणे, सौ.अनिता बोबडे, सायरा बानो, विश्वास जोगी, सुधाकरसिंह गौर,अनकेश्वर मेश्राम, हेमंत आक्केवर, सचिन गांवडे,सुनिल बकाली, बाबूलाल करुणाकर,अमोल हलदर,निताई घोष, राजवंशी, चेतन गेडाम,अनंता हुड, सुरेश बोडणे, शंकर महाकाली, असलम भाई, तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.