Home Breaking News Chandrapur @city news आ.किशोर जोरगेवारांच्या सुचने नंतर अधिका-यांच्या एका शिष्टमंडळाने दिली...

Chandrapur @city news आ.किशोर जोरगेवारांच्या सुचने नंतर अधिका-यांच्या एका शिष्टमंडळाने दिली वढा येथे भेट तिर्थस्थळाची केली त्यांनी पाहणी

102

Chandrapur@ city news

• आ.किशोर जोरगेवारांच्या सुचने नंतर अधिका-यांच्या एका शिष्टमंडळाने दिली वढा येथे भेट तिर्थस्थळाची केली त्यांनी पाहणी

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

चंद्रपुर:कार्तिकी एकादशी निमित्त येत्या 8 नोव्हेबरला वढा येथे भरत असलेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर येथील सोयी सुविधांबाबात नियोजन करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर अधिका-यांच्या एका शिष्टमंडळाने वढा येथे आज भेट दिली. या वेळी यात्रे दरम्यान करण्यात येणार असलेल्या उपयोजनां बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

चर्चा दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता अनिल टिपले, जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता शैलेश आंबेडकर, वढाचे सरंपच किशोर वरारकर, ग्रामसेवक प्रकाश रामटेके, शंकर पाटील देशमुख, संतोष मोहिजे, उषा मोहिजे, छाया गहुकर, वासुदेव ताजने, निखिल वरारकर आदींची उपस्थिती होती.

वढा जुगाद येथे वर्धा पैनगंगा नदीच्या संगम स्थळी दरवर्षी कार्तिकी एकादशी निमित्त यात्रा भरते. या स्थळी राज्याबाहेरील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यंदा 8 नोव्हेबरला कार्तिक एकादशी असल्याने यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रे पुर्वी येथील उपयोजनांच्या नियोजनासाठी अधिका-यांनी वढा तिर्थक्षेत्र स्थळी भेट देण्याच्या सुचना आमदार जोरगेवार यांनी केल्या होत्या.

आज बुधवार दि.२नोव्हेंबरला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हापरिषद येथील अधिका-यांनी वढा येथे भेट देत यात्रे बाबतच्या सोयी सुविधांच्या नियोजनाची माहिती घेतली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या सुचनाही लक्षात घेण्यात आल्यात. येथील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे, नदीत बॅरिकेटींग करण्यात यावी, भाविकांच्या सोयी सुविधांची काळजी घेण्यात यावी, वाहन पार्किंगसाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात तात्पुरत्या बसस्थानकाची व्यवस्था करण्यात यावी आदीं महत्वाच्या सुचना यावेळी करण्यात आल्या. यंदाच्या यात्रेत भाविकांना कूठलीही अडचण येणार नाही या दिशेने नियोजन करणार असल्याचे यावेळी अधिका-यांनी म्हटले आहे.