Home Breaking News Chandrapur @city news प्रेतांना अग्नी देणे झाले कठीण -मनपाचे होतेय दुर्लक्ष...

Chandrapur @city news प्रेतांना अग्नी देणे झाले कठीण -मनपाचे होतेय दुर्लक्ष ! इंदिरा नगर स्मशानभूमीत मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्याची यंग चांदा ब्रिगेडची मागणी ! आयुक्तांना दिले निवेदन!

100

Chandrapur @city news

• प्रेतांना अग्नी देणे झाले कठीण -मनपाचे होतेय दुर्लक्ष !

• इंदिरा नगर स्मशानभूमीत मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्याची यंग चांदा ब्रिगेडची मागणी !

• आयुक्तांना दिले निवेदन!

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

चंद्रपुर:इंदिरा नगर येथील स्मशान भुमीची व्यवस्था ढासळली असुन या ठिकाणी तात्काळ मलभुत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.सदरहु मागणीचे निवेदन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त विपिन पालिवाल यांना आज देण्यात आले. या वेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, रुपेश मुलकावार, महेश चहांदे, सिद्धार्थ मेश्राम, नितेश गवळे, रनजित मडावी, अतुल बोंढे आदींची उपस्थिती होती.

मनपा हद्दीतील प्रभाग क्र. 3 मधील एम.ई.एल परिसरात असलेली स्मशानभूमी अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झालेली आहे. इंदिरानगर, संजय नगर, क्रिष्णा नगर, श्याम नगर, राजीव गांधी नगर, नेहरूनगर, व बंगाली कॅम्प ह्या प्रचंड लोकसंख्येच्या परिसरात ही एकमात्र स्मशानभूमी असल्याने येथील नागरिक याच ठिकाणी अंतिम संस्कारासाठी येत असतात .मात्र येथे पुरेशा मुलभुत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रेताला अग्नी देण्यासाठी असलेल्या चभुत-याच्या मध्यभागी मोठा खड्डा निर्माण झाल्याने त्या ठिकाणी प्रेताला अग्नी देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सदरहु बाबीकडे गांभिर्याने लक्ष देत या ठिकाणी बांधकाम करुन योग्य त्या सुविधा पुरविण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. सदरहु मागणीची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेल्या एका निवेदनातून देण्यात आला आहे.