CHANDRAPUR @CITY NEWS
रेल्वे स्टेशन मार्गावरील मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम जोरात ;चंद्रपूर पोलिस पथक तैनात!
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)
चंद्रपूर: गेल्या कित्येक वर्षांपासून चंद्रपूरातील रेल्वे स्टेशन व जिल्हाधिकारी कार्यालय कडे जाणा-या मुख्य मार्गांवर व्यापारी वर्गांचे अतिक्रमण वाढले होते. त्यामुळे साहजिकच वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.या बाबतीत जनतेच्या ही अनेक तक्रारी होत्या .आज गुरुवार दि.३नोव्हेंबरला सकाळपासून मनपा प्रशासनाच्या वतीने उपरोक्त मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झालेली आहे.
दरम्यान बंदोबस्तासाठी या ठिकाणी चंद्रपूर पोलिस पथक तैनात करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.आज हटविलेले अतिक्रमण परत उद्या होवू नये यासाठी मनपातील अतिक्रमण पथकाने काळजी घेणे तेव्हढेच गरजेचे असल्याचे बोलल्या जाते.
दरम्यान या मार्गावरील व श्रीराम वार्डातील रामाळा तलाव परिसरातील शिव मंदिर नजिकचे अतिक्रमण हटविण्या संदर्भात या पूर्विच दिव्यांग मित्र बहुउद्देशिय संस्थाचे संस्थापक तथा अध्यक्ष दिलीप मिश्रा यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती.परंतु श्रीराम वार्डातील अतिक्रमण अजूनही जैसे थे आहे.या कडे मनपा प्रशासन केव्हा लक्ष वेधणार असा सवाल देखिल दिलीप मिश्रा यांनी या निमित्ताने आज उपस्थित केला आहे.