Home Breaking News Bramhpuri@ taluka news ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना वाघाच्या हल्ल्यात महिला ठार !

Bramhpuri@ taluka news ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना वाघाच्या हल्ल्यात महिला ठार !

145

Bramhpuri@ taluka news

• ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना वाघाच्या हल्ल्यात महिला ठार !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)

ब्रम्हपुरी:ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव (बु.) गावातील शेतशिवारात वाघाने हल्ला करून एका महिलेच्या नरडीचा घोट घेत तीला ठार केल्याची घटना आज दि. ३ नोव्हेंबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. जाईबाई तुकाराम तोंडरे असे त्या महिलेचे नांव असुन ती ५५ वर्षाची होती. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेली ही महिला तोरगांव (बु.)येथील रहिवाशी असल्याचे समजते .या बाबत हाती आलेल्या माहितीनुसार
असे कळते कि त्या महिलेने शेतावर धानपीकाची लागवड केली.

धानपीकाचे पीक कापणीला आले असुन त्या धानपीकाची कापनी करण्यात आली . कापनी केलेले धानपीक जमा करून त्या पीकाचे पुंजने तयार करण्यात आले. धानपिकाचे पुंजने करीत असतांना काही ठिकाणी धानापिकाची लोंब पडलेली होती ती (“सर्वा”) वेचायला स्वताच्या शेतावर गेली असता बांधाआड दबा धरून बसलेल्या वाघाने जाईबाईवर हल्ला चढवून ठार केले.
जाईबाईच्या पश्चात कुटुंबात एकूण सात जण व आप्त परिवार आहे.

तिच्या जाण्याने तोंडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन तोरगाव(बु.) गांव शोकसागरात बुडालेले आहे.
संभाव्य वाघाचे धोके लक्षात घेता संबंधित वनविभागाने नरभक्षक वाघाचा लगेच बंदोबस्त करावा व जाईबाईच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी तोरगाव (मोठा) ग्रामवासियांनी केली आहे.