Home Breaking News Chandrapur@ city news मनपा तर्फे स्वच्छता लीग अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज...

Chandrapur@ city news मनपा तर्फे स्वच्छता लीग अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळ तर्फे प्लास्टिक बंदी अभियान

124

Chandrapur@ city news

• मनपा तर्फे स्वच्छता लीग अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळ तर्फे प्लास्टिक बंदी अभियान

सुवर्ण भारत:नेहा शंकर
विशेष प्रतिनिधि शहर महानगर पालिका,चंद्रपुर

चंद्रपुर:चंद्रपूर शहराची प्रतिमा ही ”स्वच्छ चंद्रपूर सुंदर चंद्रपूर“ व्हावी या दुष्टीने शहर स्वच्छ व सूंदर करण्यास्तव चंद्रपूर शहतर महानगरपालिके तर्फे चंद्रपूर शहर स्वच्छता व सौंदर्यकरण लीग स्पर्धा राबविण्यात येत आहे.

आपण शहराचे जबाबदार नागरिक आहोत आपल्या सहकार्यामूळे लोकसहभागातून म.न.पा.ने हा संकल्प हाती घेतला आहे. सर्व नागरिक मिळून या स्वप्नाला मूर्त रूप देऊ या असे प्रतिपादन माजी नगरसेवक
सुभाष कासनगोट्टुवार यांनी म्हणाले आले.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोक सहभागातून चंद्रपूर शहर स्वच्छता व सौंदर्य करण लीग स्पर्धा १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर२०२२ या कालावधीत माझ्या शहरासाठी माझे योगदान या थीमवर वॉर्ड स्तरीय स्पर्धा घेण्यात येत आहे.

त्या अंतर्गत आज दी.४ नोव्हेंबर रोजी सकाळी माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टुवार यांच्या नेतृत्वाखाली शहीद भगत सिंह चौक एस टी वर्कशॉप येथे राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छता मंडळ तर्फे स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले यावेळी नरेश वानखेडे, शुभम मेश्राम, वामनराव ढेंगळे, अमोल तंगडपल्लीवार, विशेष गिरी,सुधाकर टिकले, श्रीकांत बडबाईक, बजरंग वानखेडे, किशोर महाजन,रमेश कासुलकर, रामराव धारने, भास्कर इसन कर,अशोक संगिडवार, दीपा नागरिकर, गीता तूरानकर,प्रीती दडमल, सीमा मडावी,अरविंद मडावी, संतोष वाघोड, भरतलाल सुरसाहू, बंडू गौरकार, रतन दातारकर, नीलकंठ, दत्तू पतरंगे, अण्याजी ढवस, कमलाबाई, आशिष ताजने, संजय कोत्तावार, सुरेश श्रीवासकर, बंडू धोटे, बाळकृष्ण बोंडे, देवराव ठावरी, देवराव बोबडे, वसंतराव धंदरे, विठ्ठलराव देशमुख, जगदीश चहांदे, प्रज्ञा बोरगमवार,विजय चीताडे, धर्माजी खंगार, पुरुषोत्तम सहारे,उषा मेश्राम,नारायण पतरंगे, प्रमोद पागडे,विलास बडवाईक, गोकुलदास पिंपळ कर,सुरेश कानोजवार, आनंदराव मांदाडे, दामोदर अवघडे,आदींची उपस्थिती होती.

माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार व सर्व सदस्यांनी मिळून शहीद भगत सिंह चौक व परिसरात स्वच्छता केली, व स्वच्छताचे यावेळी नारे देण्यात आले, सोबतच सुभाष कासनगोट्टुवार यांनी स्वच्छ्ता स्थळी नागरिकांना व भाजी विक्रेत्यांना स्वच्छताचे महत्त्व व या अभियाना बद्दल माहिती दिली ज्यामध्ये

वेस्ट ऑफ बेस्ट (टाकाऊ पासून टिकाऊ),टाकाऊ वस्तू पासून चौकाचे सौंदर्यकरण, वृक्षांची देखभाल, पेंटिंग्जच माध्यमातून घोषवाक्य लिहून जनतेला स्वच्छतेचे संदेश देणे, ओला सुका कचरा वेगळा करणे, कंपोस्तींग करणे, वॉर्ड मध्ये प्लास्टिक बंदी करणे,वॉर्ड मध्ये प्लास्टिक पिशवी बंद करून कापडी पिशवी वापरने, झाडे लावणे, या सर्व कार्याची माहिती देण्यात आली,

तसेच यावेळी प्लास्टिक बंदी अंतर्गत भाजी विक्रेत्यांना व ग्राहकांना प्लास्टिक बंदी बद्दल माहिती देऊन त्यांना कापडी पिशव्या देण्यात आले,व ज्यांनी घरातून भाजी खरेदीसाठी पिशव्या घेऊन आणले,त्यांचा टाळ्या वाजवून गौरव करण्यात आला