Home Breaking News Varora@ taluka news महिलांनी डिजिटल साक्षर होणे काळाची गरज: अँड. प्रिया...

Varora@ taluka news महिलांनी डिजिटल साक्षर होणे काळाची गरज: अँड. प्रिया पाटील चिनोरा येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न. राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड चा उपक्रम.

165

Varora @taluka news

• महिलांनी डिजिटल साक्षर होणे काळाची गरज: अँड. प्रिया पाटील

• चिनोरा येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न.

• राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड चा उपक्रम.

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

वरोरा : तालुक्यातील चीनोरा येथील ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात काल दिनांक ४ नोव्हेंबर रोजी दंतोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, प्रादेशिक संचालनालय नागपूर द्वारा एकदिवसीय अल्पकालीन प्रशिक्षण शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन एडवोकेट प्रिया पाटील सामाजिक कार्यकर्त्या यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने मंचावर शिक्षणाधिकारी व प्रशिक्षक प्रमोद रत्नपारखी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरोरा तालुका अध्यक्ष सुशीला ताई तेलमोरे, पराग सावळापूरकर ब्रांच मॅनेजर एलआयसी, सुचिता खोब्रागडे सामाजिक कार्यकर्त्या, ग्यानीवंत गेडाम सामाजिक कार्यकर्ता चिनोरा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एकनाथ चापले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या एडवोकेट प्रिया पाटील उपस्थित प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना म्हणाल्या की, आजचे युग हे डिजिटल युग आहे त्यामुळे डिजिटल साक्षर होणे काळाची गरज आहे.

तसेच कायदेविषयक मोलाची माहिती दिली. प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना शिक्षणाधिकारी प्रमोद रत्नपारखी यांनी कार्यक्रमाचे महत्त्व विशद करताना कौशल्य विकासाची कास धरून आपण उत्कर्ष साधला पाहिजे यासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना च महिलांना सक्षम बनविण्यास मदत करतात. कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयाची माहिती देऊन महिला प्रशिक्षणार्थींना जागृत करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ग्रामीण स्वयंसेविका श्रीमती सुशीला तेलमोरे, दीक्षा धाबेकर, लक्ष्मी नागापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचा लाभ शेकडो महिलांनी घेतला असून कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.