Home Breaking News Chandrapur @ city news सामान्य रुग्णालय बनतेय गरीब रुग्णांसाठी कत्तलखाना !...

Chandrapur @ city news सामान्य रुग्णालय बनतेय गरीब रुग्णांसाठी कत्तलखाना ! चंद्रपूर आम आदमी पार्टीचा आरोप

136

Chandrapur @ city news

सामान्य रुग्णालय बनतेय गरीब रुग्णांसाठी कत्तलखाना !

चंद्रपूर आम आदमी पार्टीचा आरोप

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)

चंद्रपुर:चंद्रपूर जिल्हा रुग्णालय आणि येथील व्यवस्था चंद्रपूरच्या जनते करिता आता नवीन राहिली नाही.

आम आदमी पार्टी नेहमीच येथील व्यवस्थेच्या विरोधात आपला बुलंद आवाज उचलत राहिलेली आहे अश्यातच काल मूल तालुक्यातील श्रीमती मिराबाई दिनकर येवले या ६० वर्षीय महिलेला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दुपारी १२ वाजता भरती करण्यात आले होते.

परंतु त्यांच्याकडे २४ तास उलटल्यानंतर एकाही डॉक्टरने त्यांच्याजवळ येऊन त्यांची साधी विचारपूस केली नाही. कोणताही उपचार त्यांच्यावर झाला नाही दरम्यान त्यांचा उपचार अभावी मृत्यू झाला.

याची माहिती मृतक मीराबाई येवले यांच्या मुलांनी आम आदी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांना लगेच दिली.
या बाबत जाब विचारण्याकरीता आम आदमी पक्षाचे काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले व संबंधित हजर असलेल्या डॉक्टरांना मृत्यूचे कारण विचारले असता सदरहु रुग्ण हे बीपी मुळे मृत्यू पावल्याचे त्यांनी सांगितले.

यांची तपासणी डॉक्टर सैनी यांनी केली असल्याचे ही सांगितले. आपचे पदाधिकारी यांनी आपण डॉक्टर सैनी यांनी या पेशंटची तपासणी केली हे कशावरून म्हणता तर त्यांनी मृतकांच्या फाईलवर डॉक्टर सैनी यांची स्वाक्षरी असल्याचे सांगितले.

परंतु मृतकाच्या बेड जवळील पेशंटच्या नातेवाईकांना विचारले असता सर्वांनी मागील २४ तासात एक ही डॉक्टर या वार्डात फिरकले नसल्याचे सांगितले. कोणतेही उपचार केले नाही .

जिल्हा रुग्णालयांमधील डॉक्टर मंडळींचा पेशंट वरती होत असलेला दुर्लक्षपणा लक्षात घेता आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने येथील मेडिकल ऑफिसर जीवने यांच्याकडे संपूर्ण पेशंटचे नातेवाईकांना घेऊन त्यांच्या कक्षात गेले असता त्यांनी तिथून पळ काढला.

यानंतर याची माहिती मेडिकल कॉलेजचे डीन यांना दिली. त्यांनी जीवने यांना आपल्या कॅबिनमध्ये पाठविण्यास सांगितले असता जीवने हे आमच्या सोबत मिटींगला आहे तुम्ही इकडे येऊन तुमचे प्रश्न मांडू शकता असे म्हटल्यानंतर आम आदमी पार्टीचे पदाधिकारी डीन यांना भेटण्याकरिता गेले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली.
या बाबतीत चौकशी करू‌ व नंतर कारवाई करू असे ते या वेळी म्हणत आपच्या पदाधिकाऱ्यांसमोर विषय डावलण्याचा त्यांनी प्रयत्न केला . जर तुम्हाला जिल्हा सामान्य रुग्णालयाची व्यवस्था सांभाळता येत नसेल तर तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
असे सुनिल मुसळे यांनी त्यांना ठणकावून सांगितले . जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नाव बदलून जिला कत्तलखाना रुग्णालय नाव ठेवू व तीव्र आंदोलन उभे करू याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल असा इशारा आपने प्रशासनाला दिला .
या वेळी आपचे जिल्हाध्यक्ष सुनील देवराम मुसळे, जिल्हा युवाध्यक्ष मयूर राईंकवार,शहर सचिव राजु शंकरराव कुडे आदीं उपस्थित होते.