Home Breaking News    Chandrapur @ city news चंद्रपूरात कापड दुकानाला आग – लाखों...

   Chandrapur @ city news चंद्रपूरात कापड दुकानाला आग – लाखों रुपयांचा माल आगीत जळून खाक !

153

Chandrapur @ city news

चंद्रपूरात कापड दुकानाला आग – लाखों रुपयांचा माल आगीत जळून खाक !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:चंद्रपूर शहरातील मुख्य व वर्दळीच्या मार्गावर असलेल्या एका कापड दुकानाला गुरुवारी रात्री आग लागल्यामुळे दुकानात असलेला लाखों रुपयें किंमतीचा माल जळून खाक झाल्याची घटना घडली.

जटपूरा गेट कडे जाणा-या शहरातील मुख्य मार्गावर एमफोरयु नावाचे एक कापड दुकान गेल्या काही दिवसांपासून नित्य सुरु आहे.

चंद्रपूरातील वसंत भवन चाळीत हे दुकान असून गुरुवारी रात्री अंदाजे दहा वाजताच्या सुमारास या दुकानाला आग लागली.या लागलेल्या आगीत लाखों रुपयांचा माल जळुन खाक झाला .दरम्यान दुकान मालकाचे २०ते २२लाख रुपयांचे नुकसान झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे .

आगीचे कारण मात्र कळु शकले नाही.घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.