Home Breaking News स्त्री शक्ती महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी शिल्पा कांबळेंची नियुक्ती तर उपाध्यक्षपदी मिनाक्षी...

स्त्री शक्ती महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी शिल्पा कांबळेंची नियुक्ती तर उपाध्यक्षपदी मिनाक्षी बनाईत यांची निवड!

132

Chandrapur@ city news

स्त्री शक्ती महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी शिल्पा कांबळेंची नियुक्ती तर उपाध्यक्षपदी मिनाक्षी बनाईत यांची निवड!

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)

चंद्रपुर:चंद्रपूरात नव्यानेच स्री शक्ती महिला आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीच्या अध्यक्ष पदी सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या शहरातील सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा सुहास कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर याच आघाडीच्या उपाध्यक्षपदी मिनाक्षी अनिल बनाईत यांची निवड करण्यात आली आहे.

या शिवाय या संघटनेचे सचिव पद सुवर्णा रामदास रत्ने यांचे कडे सोपविण्यात आले आहे तर सहसचिव पदाची जबाबदारी फरजाना इरफान शेख यांचे कडे देण्यात आलेली आहे.

इत्तर कार्याकारणी सदस्यांत स्वाती अश्विनी पेटकर , मिनाक्षी प्रदीप सावरकर,वर्षाताई गोंडाणे ,सुरेखा रामगोपाल खोब्रागडे,किरण कोंडावार व रुक्मीणी प्रविण सावरकर यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष शिल्पा कांबळे यांनी या प्रतिनिधीस सांगितले.
दरम्यान चंद्रपूरात नुकत्याच पार पडलेल्या एका नृत्य स्पर्धेत यातील काही सदस्यांनी भाग घेतला होता .