सपना मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ७८० चिमुकल्यांना ड्रॉईंग बुक, चॉकलेटचे वाटप
नगरपरिषदेच्या चार शाळांमध्ये सेवाभावी उपक्रम; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य
बल्लारपूर : ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत सौ. सपना सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर नगरपरिषदेच्या चार शाळांमधील तब्बल ७८० विद्यार्थ्यांना ड्रॉईंग बुक व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. दि. २० सप्टेंबर रोजी सपना मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर नगरपरिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात विजयालक्ष्मी शाळा, सुभाषचंद्र बोस शाळा, राणी लक्ष्मीबाई शाळा आणि डॉ. झाकीर हुसेन शाळा या चार शाळांमधील एकूण ७८० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. वाढदिवसाचा आनंद केवळ औपचारिक कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता तो विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडणाऱ्या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून साजरा करण्यात आल्याने उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राहिला सर यांच्यासह सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब’चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर व संस्थेचे कोषाध्यक्ष कमल वर्मा यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध पद्धतीने साहित्याचे वाटप करण्यासाठी शिक्षकवृंदातील सुरज घोंगे, आदर्श पोतल्लावार, शुभम जंगम, अनिकेत उतरलावार तसेच शाळेतील इतर शिक्षक आणि उपस्थित पालकांनी मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शिक्षक व पालकांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत सपना मुनगंटीवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.





