Home Breaking News किंग कंपनी गणेश मंडळात झोपलेल्या दोघांचे मोबाईल चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा वरोरा...

किंग कंपनी गणेश मंडळात झोपलेल्या दोघांचे मोबाईल चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा वरोरा | दि. २१ सप्टेंबर २०२६

3
Oplus_131072

किंग कंपनी गणेश मंडळात झोपलेल्या दोघांचे मोबाईल चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

वरोरा | दि. २१ सप्टेंबर २०२६

वरोरा शहरातील कर्मवीर वार्ड परिसरात गणेश मंडळाच्या मंडपात झोपलेल्या दोन सदस्यांच्या खिशातून अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. चोरी झालेल्या मोबाईलची एकूण किंमत १८ हजार रुपये आहे.

याप्रकरणी मैनक विलास निकारे (वय १९, रा. कर्मवीर वार्ड, वरोरा) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. मैनक निकारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराजवळ मित्रांसह किंग कंपनी गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून गणेशमूर्तीच्या सुरक्षेसाठी मंडळाचे सदस्य रात्री मंडपात उपस्थित राहत होते.

दि. २० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता मैनक निकारे, गणेश सुधाकर सोयाम व अन्य पाच सदस्य गणेश मंडळाच्या मंडपात झोपण्यासाठी उपस्थित होते. दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजता मैनक निकारे झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या पॅन्टच्या खिशातील Vivo Y31 मोबाईल (किंमत ८ हजार रुपये) गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गणेश सुधाकर सोयाम याचाही Poco M6 मोबाईल (किंमत १० हजार रुपये) चोरीला गेल्याचे आढळून आले.

दरम्यान, पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना शेजारी राहणाऱ्या महिलेने दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ५ वाजता गणेश मंडळाच्या मंडपातून एक अनोळखी व्यक्ती बाहेर जाताना पाहिल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच व्यक्तीने दोन्ही मोबाईल चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, वरोरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.