Home Breaking News Chandrapur@jilha news वढा यात्रेच्या निमित्ताने स्वच्छता मोहिम:आ.किशोर जोरगेवारांचा मोहिमेत सहभाग. ...

Chandrapur@jilha news वढा यात्रेच्या निमित्ताने स्वच्छता मोहिम:आ.किशोर जोरगेवारांचा मोहिमेत सहभाग. गुरुदेव सेवा मंडळाचा उपक्रम

1441

Chandrapur@jilha news

• वढा यात्रेच्या निमित्ताने स्वच्छता मोहिम:आ.किशोर जोरगेवारांचा मोहिमेत सहभाग.

•गुरुदेव सेवा मंडळाचा उपक्रम

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:कार्तिकी एकादशी निमित्त वढा येथे भरणार असलेल्या यात्रेच्या पार्श्वभुमीवर वढा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वढा येथे आज रविवारला स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
यात चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपला सहभाग नोंदविला . तसेच यावेळी येथील सोयी – सुविधांचीही आमदार जोरगेवार यांनी पाहणी केली. वढा येथील सरपंच किशोर वराडकर, ग्रामपंचायत सदस्य संजय निखारे, विचोडाचे उपसरपंच ऋषभ दुपारे, माजी सरपंच धनराज ठाकरे, यंग चांदा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राकेश पिंपकळर, धनराज हणुमंते, विजय मत्ते, पियुष भोगेवार, आदित्य निकुरे, तृप्तेष माशिरकर, राहुल त्रिंबके आदींची या वेळी उपस्थिती होती.

दरवर्षी प्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी निमित्त वढा येथे यात्रा भरणार आहे. याची तयारी प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. यंदाची यात्रा भव्य होणार असुन यात्रेत येणा-या भाविकांच्या सोयी सुविधांकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना आमदार जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे. दरम्यान आज यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थिती दर्शवित स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. तदवतचं त्यांनी यावेळी येथील उपाययोजनांचाही आढावा घेतला आहे. येणा-या भाविकांची गैरसोय होणार नाही या दिशेने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहे. राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचे त्यांनी कौतुक केले आहे.
वढा तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी आपण प्रयत्न करत आहोत. येथील विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. पूढेही विदर्भातील या पंढरपुरचा विकास करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे. कार्तिकी एकादशी निमित्त भरणार असलेल्या यात्रेसाठी ग्रामपंचायत स्तरावर उत्तम काम सुरु आहे.

प्रशासकीय स्तरावरही या बाबतचे उत्तम नियोजन करण्याच्या सुचना आपण केल्या असल्याचे यावेळी त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. या स्वच्छता मोहिमेत गुरुदेव सेवा समितीच्या सेवकांसह गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.