Home Breaking News Ballarpur@city news विश्वशांती युवा व महिला मंच, बल्लारपूर च्या वतीने धम्मचक्र...

Ballarpur@city news विश्वशांती युवा व महिला मंच, बल्लारपूर च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा.

596

Ballarpur@city news

विश्वशांती युवा व महिला मंच, बल्लारपूर च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा.

सुवर्ण महाराष्ट्र:पारिश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

बल्लारपूर:स्थानिक बुद्धनगर वॉर्ड,विश्वशांती चौक,स्थित विश्वशांती युवा व महिला मंचच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने तीन दिवसीय भरगच्च कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्याहस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रजवलन करून करण्यात आले.

बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.विजय कळसकर,यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सि.डि.सी. सी .बँकेचे संचालक डॉ. अनिल वाढई,चंद्रपूर माजी पालिका उपाध्यक्ष पवन भगत, माजी नगरसेवक राजु काबरा, सामाजिक कार्यकर्ता इंजी.राकेश सोमाणी, मोहम्मद शरिफ गुरुजी, तथा माजी नगरसेवक इस्माईल ढाकवाला यांची उपस्थिती होती.

दिनांक ४ नोव्हेंबर सायंकाळी व्याख्यान शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारवंत,संविधान अभ्यासक,भुमिपुत्र ब्रिगेड महाराष्ट्र डॉ .अमीर कदम,पुसद यांच्या प्रबोधनात्मक वख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पवन भगत लिखित “ते पन्नास दिवस ” या कांदबरीचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नागपूरचे सुप्रसिद्ध पार्श्व गायक वीरेंद्र बोरडे आणि त्यांच्या संचाद्वारे शिव,बुद्ध,फुले,डॉ.आंबेडर यांच्या जीवणार आधारित समाजप्रबोधन गीतांचा सुगम संगीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. रविवारी दि. ०६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता एकल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यात कलावंतांनी मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदविला.

विश्वशांती युवा व महिला मंच चे अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते सुमित (गोलू) डोहणे,माजी नगर सेवक आनंद रामटेके यांच्या नियोजनात तिन्ही दिवसाचा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.कार्यक्रला यशस्वी करण्यासाठी विश्वशांती युवा मंच व महिला मंच च्या कु. शेफाली देवगडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.