Home क्राईम Varora @taluka news मजुरांनी एकत्र येऊन मजूर सहकारी संस्था तयार कराव्यात....

Varora @taluka news मजुरांनी एकत्र येऊन मजूर सहकारी संस्था तयार कराव्यात. ब्रम्हपुरी दर्पण चे राहुल भोयर यांचे आवाहन

102

Varora @taluka news

• मजुरांनी एकत्र येऊन मजूर सहकारी संस्था तयार कराव्यात.

• ब्रम्हपुरी दर्पण चे राहुल भोयर यांचे आवाहन

सुवर्ण भारत:ग्यानीवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर

वरोरा:शासनाकडून मजूर सहकारी संस्थांना दर वर्षी बांधकामाची कामे लाखाच्या घरात (विना निविदा) देण्यात येतात. या बांधकामामध्ये संस्थेच्या सदस्यांना स्वतः काम करायचे असते हे काम करून बांधकामा करिता मिळत असलेल्या निधीमधील शिल्लक रक्कमे मधून मजुरांनी आर्थिक उन्नती साधावी हा यामागील मुख्य उद्देश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक मजूर सहकारी स्थापन करण्यात आलेल्या आहेत तर मजूर सहकारी संस्थेमध्ये मजूरच सदस्य असू शकतात मात्र मजूर सहकारी संस्थांमध्ये नाममात्र सदस्य हे मजूर आहेत तर बाकी भांडवलदारच हया मजूर सहकारी संस्था चालवीत असुन मजूर सहकारी संस्थेला मिळणारी कामे हे भांडवलदार स्वतःच करून मिळणारा सर्व नफा स्वतःकडे ठेवत असल्याच्या बऱ्याच तक्रारी ऐकायला मिळत आहेत.
संस्थेला मिळणारी कामे ही भांडवलदार ( ठेकेदार) स्वतः करत असल्याने व मजुर सदस्यांना मिळायला पाहिजे ती रक्कम स्वतःच्या खिशामध्ये ठेवत असल्याने हा या मजुर सदस्यांवर फार मोठा अंन्याय असून कायद्याने गुन्हा आहे.
बांधकाम मजुरीची कामे करणाऱ्यांनी एकत्र येऊन मजूर सहकारी संस्था स्थापन करावेत त्यामुळे आपल्याला अधिकचा आर्थिक फायदा नक्कीच मिळेल.

कुणाचे दुखणे वाढले कुणास ठाऊक

यापूर्वी मजुर सहकारी संस्था स्थापन करण्या करीता मजुर सहकारी संस्थाच्या जिल्हा संघाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य होते. मात्र तुमसर येथील भाजप चे तत्कालीन आमदार चरण वाघमारे यांनी नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी याकरिता सतत प्रयत्न करुन नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यास शासनास भाग पाडले.
यामुळे कुणाचे दुखणे वाढले कुणास ठाऊक महाआघाडीची सत्ता आली आणि आ. नाना पडोळे विधानसभा सभापती असताना आ.नाना पडोलेंनी नाहरकत प्रमाणपत्राची अट पूंना लागू केली.
यामुळे गरीब मजुर लोकांवर एकप्रकारे फार मोठा अन्यायच झाला.
मात्र ही नाहरकत प्रमाणपत्राची अट पुन्हा रद्द करण्याकरिता माजी आ. चरण वाघमारे व चंद्रपूर जिल्हातील शेवटच्या तालुक्यातील ब्रम्हपुरी दर्पण चे संपादक राहुल भोयर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार आयुक्त पुणे यांचेकडे वारंवार
प्रयत्न करून नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी या करिता सतत पत्र व ईमेल व्यवहार केला. याचे फलित झाले आणि मजूर सहकारी संस्थाच्या संघाची यापूर्वी आवश्यक असणारी संस्था स्थापना करण्या बाबतच्या नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली. यामुळे उशीरा का होईना पण या गरीब मजुरांना संस्था तयार करण्याकरिता संधी उपलब्ध झाली असल्याने मजूरांनी एकत्र येऊन मजूर सहकारी संस्था जास्तीत जास्त प्रमाणात तयार कराव्यात असे आवाहन ब्रम्हपुरी दर्पण चे संपादक राहुल भोयर यांनी केले आहे.