Home क्राईम Chandrapur @city news कलावंतांना प्रोत्साहन देणारा सहजं सुचलं व्हाॅटस अप गृप:...

Chandrapur @city news कलावंतांना प्रोत्साहन देणारा सहजं सुचलं व्हाॅटस अप गृप: मंथना नन्नावरे

181

Chandrapur @city news

कलावंतांना प्रोत्साहन देणारा सहजं सुचलं व्हाॅटस अप गृप: मंथना नन्नावरे

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)

चंद्रपुर: नवोदित साहित्यिकांना तसेच महिला व तरुणींच्या कला गुणांना सोबतच त्यांचे सुप्त गुणांना वाव देणारा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं हा एकमेव व्हाॅटसअप गृप असल्याचे मनोगत चंद्रपूर जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मंथना अनिल नन्नावरे यांनी आज या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

या गृप वर निव्वळ चंद्रपूर गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यातीलच महिला व तरुणीं नाही तर महाराष्ट्रातील अनेक नामवंत महिला साहित्यिक, मेकअप आर्टिस्ट, शैक्षणिक, सामाजिक व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणांऱ्या कलावंत व महिला जुळल्या असल्याचे त्या पुढे म्हणाल्या. आठ वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील वरुड या एका छोट्या गावी वास्तव्य करणारी अभियंता कु. रितू लोहकरे यांचे संकल्पनेतून या गृपची निर्मीती करण्यांत आली.

आजच्या घडीला या गृपवर १५००पेक्षा अधिक महिलां व तरुणी ह्या गृपच्या सदस्या झाल्या आहे. सदरहु गृप अल्प कालावधीत प्रसिध्दीच्या झोतात आला असुन खरोखरचं यातील काही जेष्ठ सदस्या नवोदित तरुणींसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरल्या आहे.सहजं सुचलं महिला गृपच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या मायाताई कोसरे व राजूराच्या जेष्ठ साहित्यिका मेघा धोटे ह्या आहेत. उपरोक्त गृप वरील अनेक नवोदित सदस्यांनी कला ,साहित्य सामाजिक,व शैक्षणिक क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त केले‌ आहे.विशेषता महाराष्ट्रातील वणीच्या विजया तत्वादी, क्रीडापटू कु.सायली टोपकर ,पथ्रोडच्या जेष्ठ साहित्यिका विजया भांगे , गडचिरोलीच्या शितल मेश्राम , अधिवक्ता कविता मोहरककर , मूलच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे ,चिमूरच्या कवयित्री वर्षा शेंडे,या शिवाय सामाजिक कार्यकर्त्या नागपूरच्या नयना झाडे ,चंद्रपूरच्या वंदना हातगांवकर , छबूताई वैरागडे, चंदा वैरागडे, भद्रावतीच्या किरण साळवी , रजनी रनदिवे , संगिता भोयर ,नंदिनी लाहोळे , जयश्री येरमे ,सुविद्या बांबोडे, सिमा पाटील, मुंबईच्या श्रुती उरणकर ,वर्षा आत्राम , मूलच्या वंदना आगरकाठे ,कल्याणी इटनकर, वर्षा कोंगरे , भाग्यश्री हांडे ,संगिता चिताडे, जास्मिन शेख , शारदा मेश्राम, प्रियंका मेश्राम, पुण्याच्या महिला पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांचेसहअनेक महिला व युवती या गृपच्या सदस्या झाल्या आहेत.