Home Breaking News Chandrapur@ city news महानगर भाजप महिला आघाडीच्या वतीने “त्या”घटनेचा चंद्रपूरात...

Chandrapur@ city news महानगर भाजप महिला आघाडीच्या वतीने “त्या”घटनेचा चंद्रपूरात जाहीर निषेध!मारेकरास कठोर शिक्षा देण्याची केली मागणी

189

Chandrapur@ city news

•महानगर भाजप महिला आघाडीच्या वतीने

•”त्या”घटनेचा चंद्रपूरात जाहीर निषेध!मारेकरास कठोर शिक्षा देण्याची केली मागणी

सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:देशात वारंवार अत्याचाराच्या घटना वाढत असून यात महाराष्ट्र देखिल मागे नाही.चंद्रपूरात ही दिवसें दिवस अत्याचार बलात्कार व निर्घूण खुना सारख्या घटना सतत घडत आहेत.निश्चितंच ही बाब चिंता वाढवणारी असून नुकताच मुंबईतील श्रध्दा वालकरचा तिच्या प्रियकर मित्राने तिचा खून करुन तिच्या शरीराचे तब्बल २५तुकडे केले.

श्रध्दाचा अमानुषपणे खून करणाऱ्या आफताब पूनावाला यांस कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करीत आज गुरुवार दि.१७नोव्हेंबरला शहरातील गांधी चौकात दुपारी १वाजताच्या दरम्यान चंद्रपूर महानगर भाजपा महिला आघाडीच्या वतीने अंजली घोटेकर (अध्यक्षा महानगर भाजपा महिला आघाडी चंद्रपूर)यांचे नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.

या वेळी शिला चव्हाण, मायाताई उईके, चंद्रकला सोयाम,प्रभा गुडधे, सिंधू राजगूरे,रुपाली आंबटकर, रेणू घोडेस्वार, शालू कन्नोजवार, रंजीता येले, विशाखा राजूरकर, लिलावती रविदास आदीं महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां हजर होत्या . दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस यांना उपरोक्त मागणीचे निवेदन चंद्रपूरचे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे मार्फत सादर करण्यात आले.

गांधी चौकात आंदोलन सुरू होण्या अगोदर उपस्थित महिलांनी वसईच्या दिवंगत श्रध्दा वालकरला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.