Home Breaking News Chandrapur@city news राष्ट्रीय सरपंच संसदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी महेश देवकतेंची निवड !

Chandrapur@city news राष्ट्रीय सरपंच संसदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी महेश देवकतेंची निवड !

791

Chandrapur@city news

• राष्ट्रीय सरपंच संसदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी महेश देवकतेंची निवड !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)

चंद्रपूर:-नुकत्याच पुणे येथे राष्ट्रीय सरपंच संसदेचे अधिवेशन पुणे येथील MIT युनिव्हर्सिटी मध्ये पार पडले. सदरहु अधिवेशनात महाराष्ट्र राज्या मधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान त्या मध्ये MIT राष्ट्रीय सरपंच संसदेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचे सत्कार व नियुक्ती पत्र वाटपाचा एक कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार तर अध्यक्ष म्हणून MIT चे कार्याध्यक्ष राहुलजी कराड उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे (ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये)प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांचा ओळखपत्र व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष म्हणून जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश देवकते यांची निवड करण्यात आली.त्यांनी ग्राम पंचायतच्या विविध समस्या व तालुकास्तरावरील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन MIT राष्ट्रीय सरपंच संसदेचे संस्थापक
राहुलजी कराड व राष्ट्रीय प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी महेश देवकते यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे.
देश्याच्या शाश्वत व सर्वांगिण ग्राम विकास प्रकियेत पंचायतराज व्यवस्थेतील लोकनियुक्त लोक प्रतिनिधींची भूमिका मध्यवर्ती व सर्वात महत्त्वाची आहे.

देशाच्या पंचायतराज व्यवस्थेतील लोकप्रतिनिधींचे राजकीय स्वरूपात संघटन करणे, त्यांचे सर्वांगणी प्रबोधन करणे व विविध उपक्रमांचे अभ्यासपूर्वक संयोजन करून त्यांना प्रत्यक्ष ग्रामविकास प्रक्रियेत मौलिक सहकार्य करणे हे राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे .

ग्रामविकासाचे राष्ट्रीय स्तरावरील हे महत्त्वपूर्ण अभियान यशस्वीरित्या विस्तारीत करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात योगदान देत असलेल्या आपल्यासारख्या कार्यरत व्यक्तीकडून सहकार्याची अपेक्षा आहे असे प्रतिपादन मान्यवरांनी या वेळी केले.त्याच्या निवडीचे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी ,सरपंच, उपसरपंच, व ग्राम पंचायत सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कार्यक्रमा मध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओ फोन च्या माध्यमातून उपस्थित पदाधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

राहुलजी कराड यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांनी भविष्यात चांगले काम करावे आमची संपूर्ण युनिव्हर्सिटी आपल्या सोबत कामे करतील अशी माहिती दिली. भारतीताई पवार यांनी या राष्ट्रीय सरपंच संसदेने अनेक गावातील पदाधिकारी यांना विकासात्मक कामे करण्यासाठी मार्ग दाखवावा व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे. सरकार म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास त्यांनी दिला.

महेश देवकते यांनी सदर पदाच्या माध्यमातून लोकांच्या सार्वजनिक विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी यांना योग्य मार्गदर्शन व योग्य सहकार्य करणार असल्याचा विश्वास या वेळी बोलताना दिला.