Home Breaking News Chandrapur@ city news जेष्ठांचा आशिर्वाद हीच खरी संपत्ती : आ. किशोर जोरगेवार

Chandrapur@ city news जेष्ठांचा आशिर्वाद हीच खरी संपत्ती : आ. किशोर जोरगेवार

115

Chandrapur@ city news
• जेष्ठांचा आशिर्वाद हीच खरी संपत्ती : आ. किशोर जोरगेवार

सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधि)

चंद्रपुर:जेष्ठांचा आदर करत त्यांच्या मार्गदर्शक विचारांवर चालणारा समाज सर्वोत्कृष्ठ असतो. सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी जेष्ठांच्या विचारांचे अनुसरण करण्याची गरज असते. जेष्ठांचा आशिर्वाद हिच खरी संपत्ती आहे. ७५ वर्ष पूर्ण झालेल्या जेष्ठांचा हा सत्कार कार्यक्रम म्हणजे समाजाला त्यांच्या प्रति असलेला आदर व्यक्त करणार कौतुकास्पद उपक्रम आहे. श्री वर्धमान सोशल एंड एजुकेशन अकॅडमीने सुरु केलेली ही सुरुवात प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त श्री वर्धमान सोशल एंड एजुकेशन अकॅडमीच्या वतीने जैन भवन येथे सकल जैन समाजातील जेष्ठांच्या अमृत सन्मान 2022 या सत्कार समारोह कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळु धानोरकर, निर्दोष पुगलिया, योगेश भंडारी, सुभाष जैन, गुलाबराव खंडाळे, राहुल पुगलिया, ओसवाल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जेष्ठांकडे असलेल्या विचारांच्या ठेवीची समाजाला मोठी गरज आहे. सार्वजनिक जीवन जगत असतांना जेष्ठांना अनेक अनुभव येतात. त्यांच्या या अनुभवातच यशाचा मार्ग दडला असतो. आपल्या परिवारात असलेल्या जेष्ठांसोबत आपण वेळ घालवीला पाहिजे. त्यांच्या सोबत चर्चा केली पाहीजे. त्यांच्या अनुभवाच्या पुंजीत प्रत्येक अडचणीतुन यशस्वी मार्ग दाखवीण्याची क्षमता आहे.
आजचं युग माॅडन होत चाललं आहे. अश्यातच जेष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. जेष्ठांना योग्य वागणुक दिल्या जात नसल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र हे योग्य नाही. हालाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या जेष्ठांच्या सन्मानासाठी आपल्याला समोर येणे गरजेचे असल्याचेही आमदार जोरगेवार यावेळी बोलताना पुढे म्हणाले. जैन समाज हा सामाजिक बांधिलकी जपणारा समाज आहे. जेष्ठांचा आदर करणारा समाज आहे. समाजाने सुरु केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यातुन अनेकांना प्रेरणा मिळणार आहे. सुरु झालेला हा उपक्रम शहर पातळीवर आहे. मात्र पुढच्या वर्षी हा उपक्रम जिल्हा स्तरावर आयोजीत करत जिल्ह्यातील ७५ वर्षांच्या जेष्ठांचा सन्मान करा असे आवाहनही यावेळी बोलतांना आमदार जोरगेवार यांनी समाजबांधवांना केले आहे. सदरहु कार्यक्रमात ७५ वर्षांवरील जेष्ठांचा सत्कार करण्यात आला. आयोजित कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.