Home Breaking News Chandrapur@ dist news तीन पिढ्यांची जाचक अट रद्द करून भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन...

Chandrapur@ dist news तीन पिढ्यांची जाचक अट रद्द करून भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन पट्टे द्या-सुदाम राठोड यांची मागणी !

141

Chandrapur @city news

■ तीन पिढ्यांची जाचक अट रद्द करून भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन पट्टे द्या-सुदाम राठोड यांची मागणी !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या राजूरा उपविभागातील
जिवती तालुका हा डोंगराळ, आदिवासी बहुल व अती दुर्गम भाग म्हणून अख्ख्या विदर्भात ओळखल्या जातो.

सदरहु तालुक्यात सन 1945 ते 1950 पासून अतिक्रमण धारक शेतकरी आपली शेती कसत आहे.एव्हढेच नाही तर यावरच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे,परंतु या शेतकऱ्यांना आता पर्यंत हक्काचे जमीनपट्टे मिळाले नाही.

मग ह्या शेतक-यांनी जगावे तरी कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तदवतचं या जमीन कसणां-या शेतकऱ्यांना पट्या विना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही.ही वस्तुस्थिती आहे . जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड यांनी पुन्हा एकदा आठवण म्हणून या बाबतीत एक निवेदन वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना नुकतेच दिले आहे.

सन 2019 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी शब्द दिला होता .तो आता पूर्ण करण्याची गरज आहे असे सुदाम राठोड यांनी निवेदन देते वेळी म्हटले आहे. तीन पिढ्यांची जाचक अट रद्द करून शेतकऱ्यांना जमीन पट्टे देण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.