Home चंद्रपूर शेतातील धान पीकाचे नुकसान नारायण सरकारची पोलिस स्टेशनला तक्रार दाखल! लोहारा...

शेतातील धान पीकाचे नुकसान नारायण सरकारची पोलिस स्टेशनला तक्रार दाखल! लोहारा येथील घटना

90

शेतातील धान पीकाचे नुकसान नारायण सरकारची पोलिस
स्टेशनला तक्रार दाखल!

लोहारा येथील घटना

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधि)

चंद्रपुर:ठेके पध्दतीने केलेल्या शेतात गाई ढोरे शिरले त्यामुळे धान पीकाचे नुकसान झाले यांस प्रकाश वाढई कारणीभूत आहे .त्यांचे विरुद्ध चंद्रपूर रामनगर पोलिस स्टेशनला लोहा-याचे रहिवाशी नारायण कन्नेय्या सरकार यांनी दि.२५नोव्हेबरला तोंडी तक्रार दाखल केली आहे.

या बाबत असे कळते कि चंद्रपूर समिप असलेल्या लोहारा येथे चंद्रकांत वासाडे यांची अंदाजे साडे तीन एकर धानारी शेत जमीन आहे .ही शेत जमीन गेल्या काही वर्षांपासून नारायण कन्नेय्या सरकार ठेके पध्दतीने वाहिती करीत आहे.या वर्षि याच शेतमीनीत नारायणाने श्रीराम धान लावले होते .

धानाचे पीक ही शेतात ब-यापैकी आहे.दरम्यान याच शेतमीनीला लागुन टहलानी यांची शेतजमीन असल्याचे नारायण यांनी सांगितले.दरम्यान प्रकाश वाढई यांनी ठेके पध्दतीने शेत जमीन करीत असलेल्या शेतजमीनीचे तारेचे कुंपण काढले. त्यामुळे मी करीत असलेल्या शेतात गुरे ढोरे शिरले व धानाचे नुकसान झाले.या वेळी मी शेतात गैरहजर होतो असे नारायण सरकार यांचे म्हणणे असुन तसे पोलिस तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे.नारायणची आर्थिक परिस्थिती फारच बिकट असून याच शेतजमीनीच्या भरोश्यावर त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो .

त्यांचे परिवारात शेत मजूरी शिवाय दुसरा कुठलाही व्यवसाय नाही.शेतात गाई ढोरे शिरल्याने त्याचे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.