Home Breaking News महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त चंद्रपूरात पथनाट्याचे आयोजन -योग नृत्य परीवार...

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त चंद्रपूरात पथनाट्याचे आयोजन -योग नृत्य परीवार आझाद गार्डन टीमचा पुढाकार!

161

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त चंद्रपूरात पथनाट्याचे आयोजन -योग नृत्य परीवार आझाद गार्डन टीमचा पुढाकार!

सुवर्ण भारत: किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर: मनपाच्या वतीने आयोजित स्वच्छता लीग स्पर्धे अंतर्गत आझाद गार्डन योग नृत्य परिवार तर्फे आज (सोमवार दि.२८नोव्हेंबरला)महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान योग नृत्य परिवारचे संस्थापक गोपाल मुंदडा यांनी विभुषित केले होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून ऍड. पुराणकर, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेरकी ,स्वच्छता निरीक्षक भूपेश घोते, नौकरकर , चंद्रकांत मुनगंटीवार, सी .ए. शिवम मुंदडा, राजूभाऊ शास्त्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.

सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.या नंतर योग नृत्यचे स्वच्छता लीग प्रकल्प निर्देशक मंगेश खोब्रागडे यांनी घेतलेल्या प्रकल्पा विषयी उपस्थितीतांना सविस्तर माहिती दिली. गोविंद स्वामी मंदिर स्वच्छता गट प्रमुख मुग्धा खांडे यांनी मठातल्या स्वच्छते बद्दल या वेळी विस्तृतपणे सांगितले.

उपस्थित पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून योग नृत्य परिवार करीत असलेल्या कार्यांचे मनापासून कौतुक केले. वेळ प्रसंगी सहकार्य करण्याचे टीमला त्यांनी आश्वासन दिले.आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण गोपाल मुंदडा यांनी केले.आयोजित कार्यक्रमात शक्तीनगर योग नृत्य परिवार शाखेने” प्रमोद बोरीकर लिखित व दिग्दर्शित “स्वच्छते वर प्रबोधनपर पथनाट्य या वेळी उत्तमरित्या सादर करुन उपस्थित रसिकांची दाद मिळवली .सदरहु कार्यक्रमाचे सुरेख संचालन धनंजय तावाडे यांनी केले .तर उपस्थितीतांचे आभार आकाश घोडमारे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी राधिका मुंदडासह,रुबी शेख, मीना निखारे,पुनम पिसे, संतोष पिंपळकर, मयुरी हेडाऊ,रंजना मोडक, विशाल गुप्ता, पांडे ,अल्का गुप्ता, सूरज घोडमारे,रवी निखारे, बाळकृष्ण माणुसमारे आदींनी अथक परिश्रम घेतले.