Home Breaking News पोलिस बाॅईज असोसिएशनच्या वतीने चंद्रपूरात विर शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली !

पोलिस बाॅईज असोसिएशनच्या वतीने चंद्रपूरात विर शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली !

65

पोलिस बाॅईज असोसिएशनच्या वतीने चंद्रपूरात विर शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली !

सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिनिधी)

चंद्रपुर:पोलिस बाॅईज असोसिएशन शाखा चंद्रपूर तर्फे मुंबई हल्ल्यातील विर शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
शनिवारला पोलिस लाईन नवीन पोलीस जिमखाना तुकूम येथे हा कार्यक्रम पार पडला. आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलिस उप-अधिक्षक आर्थिक गुन्हे शाखेचे शेखर देशमुख,चंद्रपूर रामनगर पोलिस स्टेशनचे एपीआय कोकोडे, पोलिस कर्मचारी तुमसरे व तिवारी उपस्थित होते.तदवतचं या कार्यक्रमाला पोलिस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे विदर्भ अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर पदमाकर निमगडे , चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्षा सविताताई प्रकाश खुटेमाटे , महिला उपाध्यक्षा सुवर्णा भगवान खोब्रागडे , जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर घनश्याम मुरस्कर , जिल्हा सचिव संजय खोबागडे , जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सद्दाम अन्सारी , शहर अध्यक्ष देविदास बोबडे , शहर उपाध्यक्ष बशीरभाई अन्सारी , तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत डोगरे , जेष्ठ सदस्य तोजितचंद पिपरे, जि.सहसंपर्क प्रमुख दिलीप उरकुंदे , जंयता डेहनकर , छगन सेलोटे ,स्वप्नील क्षीरसागर , साहील मडावी , शशीकला शेन्डे , कल्पना जेनेकर, अनिता बोनगिरवार, राजश्री गेडाम , नलुताई राऊत,छाया जाधव, अश्विनी कुडमेथे , संगिता जुमनाके , श्रध्दा निकोडे , महिला सचिव सपना इनमुलवार, पुष्पा कुळमेथे, आदींची उपस्थिती लाभली होती.