Home Breaking News Chandrapur@city news बंगाली कॅम्पच्या प्रभाग ४मधील रस्त्याची दुर्दशा ! अर्धा...

Chandrapur@city news बंगाली कॅम्पच्या प्रभाग ४मधील रस्त्याची दुर्दशा ! अर्धा रस्ता बनविला अर्धा कोण बनविणार ? नागरिकांनी उपस्थित केला सवाल !

107

Chandrapur@city news

■ बंगाली कॅम्पच्या प्रभाग ४मधील रस्त्याची दुर्दशा !

■ अर्धा रस्ता बनविला अर्धा कोण बनविणार ?

■ नागरिकांनी उपस्थित केला सवाल !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर :चंद्रपूर शहरात मोडत असलेल्या बंगाली कॅम्प येथील प्रभाग ४मधील रस्त्याची अवस्था फारच बिकट असून अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे काल प्रत्यक्षात दृष्टीक्षेपात पडले .

मध्यंतरी स्थानिक नागरिकांनी या बाबतीत आपला आवाज बुलंद केला होता. तेव्हा प्रशासनाने येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात केली . काम बघून येथील नागरिक समाधान व्यक्त करीत होते .

परंतू हे काम अर्धवट सोडल्यामुळे परत एकदा नागरिकांत आता संतापाची लाट उसळली आहे.एकिकडे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावात रस्त्यांचे कामे झपाट्याने सुरु असतानाच बंगाली कॅम्प प्रभाग ४मधील रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून बंद पडले आहे.

या प्रभागात जो रस्ता व घरे आहे. तेथील लोक संख्या अंदाजे एक हजारच्या घरात असून जनतेच्या सेवेसाठी हा रस्ता तयार व्हावा म्हणून या भागातील सामाजिक कार्यकर्त्या संगिता भोयर यांनी बरेच प्रयत्न केले .अजून ही त्यांची ह्या रस्त्यासाठी सातत्याने धडपड सुरू आहे.सदरहु प्रभागात मोठ्या प्रमाणात जनता वास्तव्याने असून ते दरवर्षी चंद्रपूर मनपाला न चुकता नियमित पणे घरटॅक्स भरीत असतात .

परंतू मनपाचे या रस्त्याकडे मुळीच लक्ष नसल्याचे एकंदरीत दिसून येते . दरम्यान पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था फारच बिकट व दयनीय राहत असल्याचे त्या भागातील नागरिकांनी काल या प्रतिनिधीस सांगितले.

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर, या क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी व मनपा प्रशासनाने या कडे त्वरित लक्ष वेधून नागरिकांची समस्या सोडवावी अश्या आशयाची मागणी या भागात गेल्या ३१वर्षा पासून राहत असलेल्या एम .आर .माटूरवार ,अच्युतम नायर ,राजेश गुप्ता,नित्ताई कुंडू ,बाबूल हजरा,राधा अय्यर ,संजय कुमार जैन ,सुरेश कुमार जैन सचिन कत्याल,रामकरी यादव , परिमल विश्वास,आशुतोष शहा , रामसिंग केरवा,राजेश वर्मा, रामसिंग ठाकूर ,शर्मिला केरवा, संदीप खांडेकर,मनोज तायडे आदींनी केली आहे.दरम्यान या परिसरातील अर्धा सिमेंट रस्ता बनविला तर अर्धा रस्ता कोण बनविणार असा सवाल देखिल त्यांनी उपस्थित केला आहे.