Home Breaking News Korpna@city news कन्हाळगाव सरपंच विनोद नवले राष्ट्रवादीची घड्याळ बांधणार ?

Korpna@city news कन्हाळगाव सरपंच विनोद नवले राष्ट्रवादीची घड्याळ बांधणार ?

112

Korpna@ city news

■कन्हाळगाव सरपंच विनोद नवले राष्ट्रवादीची घड्याळ बांधणार ?

सुवर्ण भारत:मनोज गोरे
कोरपना शहर प्रतिनिधी

कोरपना:कोरपणा तालुक्यातील निवडणुका नुसताच पार पडल्या या निवडणुकीमध्ये तालुक्यातील भाजपा तालुका अध्यक्ष व काँग्रेस यांच्या विरोधात निवडणूक लढवून संपूर्ण सत्ता प्रस्थापित केली आता मात्र नवले यांचे पक्ष बदलण्याचे हालचाल सुरू झाली असून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार ? असल्याचे सर्वत्र चर्चेला उतआला आहे तेव्हा अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विनोद नवले यांच्याशी संपर्क करून आपल्या पक्षात त्यांना कसे खेचून आणता येईल याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहेत तेव्हा विनोद नवले कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करतील हे मात्र येणारी वेळ ठरणार आहे त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपले मत मांडत असताना एका चांगल्या राजकीय पक्षांचा आपण निर्णय घेऊ असे मत व्यक्त केलेत येणाऱ्या काही दिवसातच विनोद नवले एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची खमंग चर्चा आहे मागील पाच वर्षात नवले यांनी भाजप पक्षाचे सरपंच होते भाजप पक्षाचे एक निष्ठेने काम केले तेव्हा भाजप पक्षांचे वरिष्ठ नेते मंडळी कडून नवले यांना पक्षात सामील करण्याकरिता प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहेत मात्र भाजप पक्ष नवले यांना भाजपमध्ये कायम राहण्यासाठी कितपत यशस्वी ठरेल हे मात्र अजून पर्यंत निश्चित झाले नाहीत निवडणूक झालेला आज महिन्याचा कालावधी लोटला असून नवले त्यांनी अजून पर्यंत कोणत्याही पक्षाची घोषणा केली नाहीअपक्ष असल्याचे बोलले जात आहेत आता मात्र एका राजकीय पक्षाच्या संपर्कात असून येणाऱ्या काही दिवसात त्यांची पक्षप्रवेशांची सर्वत्र चर्चेचा उधाण आले असून कोण्या राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कोरपणा तालुक्यातच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यात कन्नड गाव ग्रामपंचायतचे लक्ष लागले होते ही लढत संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी ठरली असून विनोद नवले गटांनी कन्हाळगाव ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस व भाजप गटांच्या उमेदवारांची पराभव करून अपक्ष सत्ता प्रस्थापित केली मात्र आपणाला गावांचा विकास करायचा असल्याने आपण राजकीय पक्षांच्या साथीने गावचा विकास करून व आपण येणाऱ्या काही दिवसात राजकीय पक्षात प्रवेश करू असे मत व्यक्त केलेत मात्र कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे मात्र अजून पर्यंत निश्चित झालेले नाहीत अनेक पक्षांनी पदाची ऑफर देण्याचे सुद्धा बोलल्या जात आहेत तेव्हा विनोद नवले काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत