Home Breaking News Chandrapur@city news चंद्रपूरातील योग नृत्य परीवार आझाद गार्डन संघाचे कार्य कौतुकास्पद!...

Chandrapur@city news चंद्रपूरातील योग नृत्य परीवार आझाद गार्डन संघाचे कार्य कौतुकास्पद! गोपाल मुंदडा व मुग्धा खांडेंसह टीमचे सदस्य घेत आहे अथक परिश्रम !

99

Chandrapur@city news

चंद्रपूरातील योग नृत्य परीवार आझाद गार्डन संघाचे कार्य कौतुकास्पद!

गोपाल मुंदडा व मुग्धा खांडेंसह टीमचे सदस्य घेत आहे अथक परिश्रम !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंन्द्रपुर:शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या योग नृत्य परीवार आझाद गार्डन संघाने स्थानिक महानगर पालिका आयोजित स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला असून नुकतेच त्यांनी वृक्षारोपण केले. सोबतच रंगवटीचे काम सुरू केले आहे.

ज्या ठिकाणी नागरिक कचरा टाकत होते .ती जागा पूर्णता स्वच्छ करून तेथे एका कृष्ण मूर्तीची त्यांनी स्थापन केली. जेणेकरून लोक आता परत त्या ठिकाणी कचरा टाकणार नाही.कृष्ण मूर्ती ही या परिसरातील मंगलाताई यांचे कडून लोकसहभागातून मिळाली असल्याचे गोपाल मुंदडा व संघ प्रमुख मुग्धा खांडे यांनी आमचे प्रतिनिधीस आज चंद्रपूरात एका भेटी दरम्यान सांगितले.

प्रवीण नौकरकर यांनी सुध्दा टीमला मदत केली असल्याचे मुग्धा खांडे यांनी बोलतांना सांगितले. महानगर पालिकेच्या या उपक्रमामुळे आम्ही तर जागे झालोच पण इतर नागरिकांना सुध्दा जागे करण्यात आम्ही भरभरुन यश मिळवित असल्याचे त्या म्हणाल्या. आज स्वतःहून लोक पुढे येऊन मदत करीत आहेत ही खरंच आमच्या साठी आनंदाची बाब आहे.
या यशाचे श्रेय ख-या अर्थाने आमच्या टीमच्या सर्व सदस्यांना जाते.

हे सांगण्यास खांडे या वेळी विसरल्या नाहीत विशेषतः गोपाल मुंदडा, मंगेश खोब्रागडे, रंजना मोडक ,सुरेश घोडके, सूरज घोडमारे, आकाश घोडमारे,किशोरी हिरुडकर, पुनम पिसे, मयुरी हेडाऊ, मीना निखारे, रवी निखारे, शिवानी कुलकर्णी, , रुबी, शेख, बाळकृष्ण माणूसमारे, पांडेजी, पिंपलकर, विनोद कामनवार, चंद्रशेखर मुनगंटीवार, नागापुरे अलका मून, अलका गुप्ता, सविता उराडे,साहिल चौधरी व अन्य सभासदांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याचे ह्या टीमच्या संघ प्रमुख मुग्धा खांडे शेवटी म्हणाल्या .एकंदरीत सध्या तरी या टीमचे काम अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे. हे तेव्हढेच खरे आहे.