Home Breaking News Chandrapur city @news बालनाट्य स्पर्धेत कामगार वसाहत सिंदी मेघेंचे “खेळ बाल...

Chandrapur city @news बालनाट्य स्पर्धेत कामगार वसाहत सिंदी मेघेंचे “खेळ बाल नाट्य” ठरले प्रथम पारितोषिकाचे मानकरी !

133

Chandrapur city @news

बालनाट्य स्पर्धेत कामगार वसाहत सिंदी मेघेंचे “खेळ बाल नाट्य” ठरले प्रथम पारितोषिकाचे मानकरी !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललीत कला भवन, बंगाली कॅम्प,चंद्रपूर येथे गटस्तरीय बालनाटय स्पर्धा दि.30 नोव्हेंबरला कल्याण आयुक रविराज इळवे व सहाय्यक कल्याण आयुक्त नागपूरचे नंदलाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

स्पर्धेच्या पारितोषीक वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान जेष्ठ नाट्य कलावंत, परिक्षक सुधाकर पाटील यांनी विभुषित केले होते. तर चंद्रपूर कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
आयोजित स्पर्धेत एकुण 08 बालनाट्य संघ सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम पारितोषिक कामगार वसाहत सिंदी मेघे, (वर्धा )येथील ” खेळ” या नाटकाने , व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक कामगार कल्याण केंद्र, हिंगणघाट येथील बालनाटय ” द डार्क एज” ने प्राप्त केले तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस कामगार कल्याण केंद्र, वर्धा येथील ” आदिबांच्या बेटावर “या बालनाट्याने पटकाविले. अभिनयात. मुलांमध्ये प्रथम- सौरव मडावी, सम्यक अकोले,व शौर्य नागदेवते यांनी तर अभिनय मुलीमध्ये प्रथम जान्हवी ढोबरे, भुमी अलोने आणि संजना रामटेके यांनी पारितोषिक मिळविले.

दिग्दर्शनात प्रथम क्रमांकाचे बक्षिस प्रतिक सुर्यवंशीने व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक आशिष पोटानेने तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रतीक सुर्यवंशी यांनी मिळविले
सदरहु गटस्तरीय बालनाट्य स्पर्धेचे परिक्षण चैताली बोरकुटे,विशाल ढोक,व आदिती मिश्रा यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे यांनी केले त्यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या योजना व उपक्रमाची सविस्तरपणे माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश इटनकर व किरण उपरे यांनी केले .तर उपस्थितीतांचे आभार श्रीमती छाया गिरटकर यांनी मानले .रंगमंच व्यवस्था दौलत गोरे, सुरेश इटनकर,व श्रीमती. छाया गिरटकर यांनी बघितली
बाल नाट्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.